शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांनाही मिळणार संधी?; मोदी सरकार घेऊ शकतं ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:21 IST

गृह मंत्रालयानं निमलष्करी दलांकडून मागवल्या सूचना

ठळक मुद्देतृतीयपंथीयांना निमलष्करी दलांमध्ये संधी देण्याचा विचार सुरूगृह मंत्रालयानं निमलष्करी दलाकडून विस्तृत अहवाल मागितलानिवड प्रक्रियेसाठी लागणाऱ्या पात्रतेत लवकरच बदल होण्याची शक्यता

नवी दिल्ली: निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी गृह मंत्रालयानं विविध दलांच्या सूचना आणि शिफारसी मागवल्या आहेत. पुरुष आणि महिला यांच्यासोबत तृतीयपंथीयांनादेखील निमलष्करी दलांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी नियमांची पडताळणी करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) परीक्षेच्या नियमांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. निमलष्करी दलांमध्ये तृतीयपंथीयांना संधी देण्याचा विचार गृह मंत्रालयाकडून अतिशय गांभीर्यानं सुरू आहे. यासाठी गृह मंत्रालयानं विविध विभागांकडून त्यांची मतं मागवली आहेत. यामध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयानं या विभागांकडून विस्तृत अहवाल मागितला आहे. त्यानंतर गृह मंत्रालय यासंबंधीचा निर्णय घेईल.गृह मंत्रालयाला निमलष्करी दलांनी सकारात्मक अहवाल दिल्यास चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर तृतीयपंथी अधिकारी तैनात होतील. आयटीबीकडे भारत-चीन सीमेची जबाबदारी आहे. याशिवाय पाकिस्तान सीमेवरही तृतीयपंथीय अधिकारी कर्तव्य बजावताना दिसतील. देशातील नक्षलग्रस्त भागांची जबाबदारीदेखील त्यांच्याकडे सोपवण्यात येईल.गृह मंत्रालयानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाकडे (सीएपीएफ) या प्रकरणी विस्तृत अहवाल मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निवड प्रक्रियेत आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती गृह मंत्रालयानं दिली. आयटीबीपी, बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफ यांचा समावेश निमलष्करी दलांमध्ये होतो. हे सर्व विभाग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. देशांतर्गत महत्त्वाच्या भागांसह सीमावर्ती भागात या विभागांचे जवान महत्त्वाची कामगिरी बजावतात. भारताच्या दोन मित्रांचा इरादा पक्का; शेवटच्या क्षणी चीनला जोरदार धक्का"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरHome Ministryगृह मंत्रालय