शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हिज्बुलचा कमांडर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:02 IST

जम्मू : दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचा जवान सुमेध वामन गवई, तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांचा समावेश ...

जम्मू : दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर यासिन इटू उर्फ गजनवी याच्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत सैन्याचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या जवानात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचा जवान सुमेध वामन गवई, तामिळनाडूतील जवान इलयाराजा पी यांचा समावेश आहे.शोपिया जिल्ह्यात अवनीरा गावात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जम्मू - काश्मीर पोलीस, सैन्यदल आणि सीआपीएफने विशेष मोहीम हाती घेऊन तपास सुरू केला. याच वेळी चकमक उडाली. यात सैैन्याचे पाच जवान जखमी झाले. जखमी झालेल्या पाच जवानांना सैन्याच्या ९२ बेस येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन जवानांचा नंतर मृत्यू झाला.रात्रभर चकमक सुरू होती. सकाळी तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात तांत्रिक आणि आॅनलाइन काम पाहणारा इरफान आणि गजनवी याचा खासगी सुरक्षा रक्षक उमर यांचा समावेश आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर एक केके सीरिजची रायफल आणि दोन एके सीरिजच्या रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.।कोण होता यासिन इटूहिज्बुल मुजाहिद्दिनचा स्वयंभू कमांडर अशी त्याची ओळख होती. गतवर्षी बुºहान वानीला मारल्यानंतर, काश्मिरातील कारवायांत तो सहभागी होता. त्याने संघटनेत अनेकांची भर्तीही केली आहे.१९९६ मध्ये हिज्बुलशी जोडला गेला होता. २००७ मध्ये त्याने आत्मसमर्पण केले होते. २०१४ मध्ये पॅरोलवर सोडल्यानंतर, तो पुन्हा अतिरेकी संघटनेत सहभागी झाला.अतिरेकी पळ काढत आहेतकाश्मिरातून आता अतिरेकी पळ काढत आहेत. घुसखोरी करणाºया अतिरेक्यांची संख्याही घटली आहे. चकमकीच्या वेळी यापूर्वी शेकडो लोक दगडफेक करत, अतिरेक्यांना पळून जाण्यात मदत करत होते, पण आता या दगडफेक करणारांची संख्या २०, ३० अशी झाली आहे.- अरुण जेटली, संरक्षणमंत्रीवर्षभरात १३२ अतिरेकी मारलेजम्मू -काश्मिरात या वर्षी १३२ अतिरेक्यांना ठार मारले आहे. यात सहा मोठे अतिरेकी होते. त्यात लष्कर-ए- तोयबाचा अबू दुजाना, बुºहान वानीचा उत्तराधिकारी सबजार अहमद भट आदींचा समावेश आहे. गत सात वर्षांच्या तुलनेत या सात महिन्यांत काश्मिरात सर्वाधिक अतिरेक्यांना मारण्यात आले.आज अंत्यसंस्कारशहीद सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे सोमवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.