शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

By बापू सोळुंके | Updated: February 19, 2023 12:26 IST

आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण आग्रा शहरात भगवे झेंडे आणि होर्डिग्ज लावण्यात आल्या आहेत. आग्रा किल्ल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे.

 आग्रा : आग्रा येथील किल्ल्यात रविवारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रीय मंत्री, राज्यातील अर्धा डझन मंत्री आणि देशभरातील सुमारे 10 हजार शिवप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी आग्रा येथे दाखल होत आहे. 

आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये प्रथमच शिवजयंती साजरी होत आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. जेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान तळपला, त्याच ठिकाणी आज 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी किल्ल्यामधे ४०० शिवभक्तांना प्रवेश राहणार आहे. तर १० हजार शिवभक्त राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत.

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने दिवान ए आम समोर भव्य स्टेज उभारला जात आहे. या शिवजयंती सोहळ्याची सुरवात महाराष्ट्र गीताने होईल आणि त्यानंतर शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे महाराष्ट्रात परतले याबाबतचं एक विशेष नाटक या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुरातत्व विभागाचे कॅबिनेट मंत्री जी. किशन रेड्डी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. यानंतर नेत्रदीपक आकर्षक आतिषबाजीने सोहळ्याची सांगता होईल.

आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण आग्रा शहरात भगवे झेंडे आणि होर्डिग्ज लावण्यात आल्या आहेत. आग्रा किल्ल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे. पारंपरिक वेषभूषा करून स्थानिक मराठी बांधव, महिला आणि लहान मुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करीत अभिवादन करीत आहेत. 

आजही आम्ही सहपरीवार येथे आलो आहोत -महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेले शेकडो मराठी बांधव येथे सोन्या-चांदीचे व्यवसायात स्थिरावलेले आहेत. त्यांपैकी सावित्रीबाई चिंचोलकर यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी येथे किल्ल्याजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतो. आजही आम्ही सहपरीवार येथे आलो आहोत. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती