शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये झाले ऐतिहासिक ६४.६६ टक्के मतदान; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:08 IST

पहिल्या टप्प्यातील १२१ जागांवरील १३१४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी १२१ जागांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३.७५ कोटी मतदारांपैकी ६४.६६ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. हे त्या राज्यातील आजवर झालेले सर्वाधिक मतदान आहे. राज्यात मतदान सुरू असताना काही ठिकाणी हिंसाचाराच्या किरकोळ घटना घडल्या. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी आपल्या ताफ्यावर राजदच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा केला. बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७.३२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ समस्तीपूर (६६.६५ टक्के) आणि मधेपुरा (६५.७४ टक्के) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. पहिल्या टप्प्यात राजदचे तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा तसेच अनेक मंत्री अशा महत्त्वाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा कारभार तसेच १२५ युनिट मोफत वीज, एक कोटीहून अधिक महिलांना १० हजार रुपयांची रोख मदत, सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये वाढ अशा निर्णयांमुळे मतदार एनडीएलाच मतदान करेल अशी त्या आघाडीला आशा आहे. मात्र, बिहारमध्ये आता सत्तापालटासाठी मतदान करा, असे आवाहन इंडिया आघाडीकडून जनतेला करण्यात आले.

मतदान वाढल्याने काय घडले?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे ६४.६६ टक्के मतदान नोंदवले गेले. एकूण १८ जिल्ह्यांतील सर्व ४५,३४१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. यापूर्वी बिहारमध्ये २००० साली सर्वाधिक ६२.५७ टक्के मतदान झाले होते. यावेळी नितीशकुमार यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, तेवढे संख्याबळ नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी सरकार स्थापन केले.

शहरी मतदारसंघांमध्ये कमी मतदान

बिहारमध्ये गुरुवारी १८ जिल्ह्यांत मतदान झाले. मुजफ्फरपूर आणि गोपालगंज येथे दुपारी ३ वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर पाटणा जिल्ह्यात मतदानाचा टक्का केवळ ४८.६९ एवढाच होता. बंकीपूर येथे ३४.८० टक्के, दिघा येथे ३१.८९ टक्के आणि कुम्हरार येथे ३७.७३ टक्के या शहरी मतदारसंघांत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही.

‘मतदान आपली जबाबदारी’

मतदान हा अधिकार नाही, तर ती महत्त्वाची जबाबदारीही आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले. बख्तियारपूर या मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी याबाबत पोस्ट केली.

‘राजद समर्थकांचा हल्ला’

मतदानादिवशी राजदच्या समर्थकांनी आपल्या ताफ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी केला. हे लोक मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न करीत होते, असे त्यांनी नमूद केले.  

‘निवडणूक चोरी’ची तयारी : प्रियांका

हरयाणाप्रमाणेच बिहारमध्येही एनडीए ‘निवडणूक चोरी’च्या तयारीत असल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. विविध जाहीर सभांत त्यांनी निवडणूक आयोगही देशाची घटना तसेच लोकशाही कमकुवत करण्यासाठी सरकारशी हातमिळवणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Records Historic 64.66% Voter Turnout; Peaceful Polling Except Minor Incidents

Web Summary : Bihar witnessed a historic 64.66% voter turnout in the first phase of assembly elections. Minor incidents of violence were reported. NDA hopes for victory due to Nitish Kumar's governance, while the opposition calls for change. Urban areas saw lower turnout.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Votingमतदान