शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मशिदीच्या रस्त्यासाठी हिंदूंनी दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 06:14 IST

रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद धगधगत असलेल्या अयोध्येपासून १५० किलोमीटर अंतरावरील संत कबीरनगर जिल्ह्यातील थवाईपार गावामध्ये मात्र हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारी एक आगळी घटना घडली.

फैजाबाद : रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद धगधगत असलेल्या अयोध्येपासून १५० किलोमीटर अंतरावरील संत कबीरनगर जिल्ह्यातील थवाईपार गावामध्ये मात्र हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारी एक आगळी घटना घडली. या गावातील एका मशिदीकडे मुुस्लिमांना जाणे सुकर व्हावे, यासाठी गावातील हिंदूंनी आपल्या जमिनी त्यांना रस्ता बांधण्यासाठी दान केल्या.थवाईपार गावचे तत्कालीन सरपंच इन्सान अली यांच्या मालकीच्या जागेवर १९६३ साली ही मशीद बांधण्यात आली. तिथपर्यंत जाण्यास नीट रस्ता नव्हता. २० वर्षांपासून एका अरुंद गल्लीतून व घाण पाण्यातून वाट काढत मशिदीपर्यंत जावे लागे. वेगवेगळ््या लोकांच्या मालकीच्या जागांतून जी वाट जात होती तिचाच वापर होई. गावातील लोकसंख्या वाढली. प्रत्येकाने जागांना कुंपण घालून घेतले. त्यामुळे मशिदीकडे जाणारी वाट बंद झाली. केवळ एक अरुंद गल्ली उरली होती. तिथून ते मशिदीत जाऊ लागले. ही गैरसोय टाळण्यास हिंदूंनी जमीन दिली. (वृत्तसंस्था)>गावच्या सरंपच उर्मिला देवी व माजी सरपंच ब्रिजेश सिंग तसेच राजेंद्र सिंग, महेंद्र सिंग, कपिलसिंग, नकचेद सिंग अशा सहा हिंदूंनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या मालकीची जमीन मशिदीसाठी मोठा रस्ता बांधण्याकरिता दान केली. त्यातून आता १०० मीटर लांबीचा मोठा रस्ता बांधून पूर्ण झाला आहे. यासंदर्भात अश्फाक या रहिवाशाने सांगितले की, या अनोख्या कृतीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्याचे दर्शन झाले.>गावातील हिंदू-मुस्लिमांत कधीही तणाव निर्माण झाला नाही. मशिदीकडे जायला मोठा रस्ता हवा याकरिता काही पावले उचलणे आवश्यक होते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या