शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

आठ राज्यांत हिंदुंना अल्पसंख्याक म्हणून दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:19 IST

१४ जूनला आयोगाची बैठक : सुप्रीम कोर्टात आली होती याचिका, इतर धर्मांसाठी दिलेल्या सवलतींचाही उल्लेख

नवी दिल्ली : देशाच्या आठ राज्यांतील हिंदुंना अल्पसंख्याक म्हणून दर्जा द्यावा का, याचा निर्णय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या १४जूनच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्यांला या प्रश्नासाठी आयोगाकडे जाण्याचे सुचविले होते.जम्मू-काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मणिपूर या आठ राज्यांमध्ये हिंदुंचे प्रमाण अन्य धर्मगट वा समाज यांच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे तेथील हिंदू समाजाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करून, तसे अधिकार देण्यात यावेत, अशा आशयाच्या मागणीची भाजपाचे अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने निर्णय घ्यावा, असे सांगून याचिकाकर्त्याने तिथे जावे, असे सांगितले होते. आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगच त्याबाबत १४ जून रोजी यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिमांचे प्रमाण ६८.३0 टक्के असतानाही राज्य सरकारने ७५३ पैकी ७१७ शिष्यवृत्त्या मुस्लीम विद्यार्थ्यांनाच देण्यात आल्या आणि एकाही हिंदू विद्यार्थ्याला ती मिळाली नाही, अशी तक्रार याचिकेत करण्यात आली होती. केंद्र सरकारने देशात १९९६ साली मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारशी धर्मीयांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला आणि २0१४ साली त्या यादीत जैनांचाही समावेश केला, याचा उल्लेखही याचिकेत आहे.

 

टॅग्स :HinduहिंदूBJPभाजपा