शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्याचा बदला, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:13 IST

हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट गुरुवारी (31 जानेवारी) हॅक करण्यात आली.

ठळक मुद्देअखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट हॅकमहात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या;संबंधितांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा - हॅकर्स'हिंदू महासभा मुर्दाबाद' - हॅकर्स

नवी दिल्ली - हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट गुरुवारी (31 जानेवारी) हॅक करण्यात आली. बुधवारी (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी या संघटनेकडून महात्मा गांधींच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला. या संतापजनक घटनेनंतर केरला सायबर वॉरिअर्सनं अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइटच हॅक केली.वेबसाइटच्या संकेतस्थळाला http://www.abhm.org.in/ भेट दिल्यास, त्यावरील होम पेजवर हॅकिंग टीमच्या मागण्या दिसत आहेत. 

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी हॅकिंग टीमने केली आहे. सोबतच वेबसाइटवर 'हिंदू महासभा मुर्दाबाद' असेही लिहिले आहे.  

नेमका काय आहे प्रकार?बुधवारी (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथी दिनी हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेय यांनी गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले.  यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले. 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणाही दिल्या गेल्या. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  'महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.'असे संतापजनक वक्तव्यही पूजा  शकून पांडेय हिने केले. दरम्यान, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  याप्रकरणी अलिगड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, पूजा पांडेयसहीत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅकया घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी  केरला साइबर वॉरिअर्सच्या टीमनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली. लोकांना महात्मा गांधींकडून अहिंसा आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली, असा मजकूर हॅकिंग टीमकडून वेबसाइटवर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. 

केरळमधील पूरपरिस्थितीवर प्रतिक्रिया देताना हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणि यांनी म्हटले होते की, 'जी लोक बीफ खात नाहीत, त्यांनाच मदत केली पाहिजे'. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी हॅकर्सनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली होती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमHinduहिंदूMahatma Gandhiमहात्मा गांधी