शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी भाषिक मजुरांचे गुजरातमधून पलायन; साबरकांटा बलात्कार प्रकरणामुळे होणाऱ्या हल्ल्यांचा घेतला धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 05:39 IST

येथील चाणक्यपुरी उड्डाणपुलापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला जाणा-या खासगी बसेसमधून स्वगृही परतण्यासाठी सध्या अनेक परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळली आहे.

अहमदाबाद : येथील चाणक्यपुरी उड्डाणपुलापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला जाणा-या खासगी बसेसमधून स्वगृही परतण्यासाठी सध्या अनेक परप्रांतीय मजुरांची गर्दी उसळली आहे. एका बिहारी मजुराने गेल्या आठवड्यात गुजरातमधील साबरकांटा जिल्ह्यामध्ये १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गुजरातमधील नागरिकांकडून परप्रांतीय मजुरांवर हल्ले चढविले जात आहेत. परप्रांतीय मजुरांना गुजरातमधून निघून जाण्याचा सल्ला ते ज्यांच्याकडे काम करतात त्यापैकी काही उद्योजकांनीच दिला आहे. गेल्या काही दिवसांत सुमारे १५०० परप्रांतीय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथील आपापल्या गावी निघून गेले आहेत. हा प्रवास २५ ते ३० तासांचा असून प्रत्येक बसमध्ये ८० पेक्षा जास्त माणसे कोंबलेली होती. शनिवारी अहमदाबादहून सुमारे २० बस या तीन राज्यांना रवाना झाल्या. अन्यथा या राज्यांसाठी अहमदाबादहून दर दोन दिवसांनी एखादी खासगी बस सुटते व त्यात २५ प्रवासीही नसतात. ३४२ जणांना केली अटकहिंदी भाषिक स्थलांतरित मजुरांवर हल्ले केल्याप्रकरणी आत्तापर्यंत ३४२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ज्या आठ जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत तेथे या लोकांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आले आहेत, असे गुजरातचे पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी सांगितले. मात्र या स्थलांतरित मजुरांनी भीतीने मोठ्या संख्येने गुजरात सोडून जाण्यास सुरुवात केली आहे, याचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, हे लोक सणासुदीसाठी गावी जात असतील. त्याचा वेगळा अर्थ लावला जाऊ नये. तरीही या लोकांच्या वस्त्यांमध्ये जाऊन असे कोणी जाताना आढळल्यास त्यांना परावृत्त करण्यास अधिकाºयांना सांगण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Gujaratगुजरात