शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीने २५ भाषा संपविल्या, आम्ही ‘तमिळ’चे रक्षण करू; मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:40 IST

हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे.

चेन्नई : तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांचा आम्ही प्राणपणाने विरोध करू. हिंदी भाषा हा मुखवटा व त्याच्या आड दडलेली संस्कृत भाषा हा खरा चेहरा आहे. तमिळ भाषा व संस्कृतीचे रक्षण करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी सांगितले. 

ते म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे हिंदी भाषा लादण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा स्टॅलिन यांचा आरोप केंद्र सरकारने याआधीच फेटाळून लावला आहे. हिंदी भाषेच्या विरोधात ‘द्रमुक’ने १९६५ साली आंदोलन केले होते. तसेच आंदोलन आम्ही आता दुसऱ्यांदा उभारू, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे.

ते म्हणाले की, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील मैथिली, ब्रजभाषा, बुंदेलखंडी, अवधी या भाषा हिंदीच्या प्रभावामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर भारतातील २५ हून अधिक भाषांचा हिंदी-संस्कृतच्या वर्चस्वामुळे ऱ्हास होत आहे. मात्र, किमान शतकभर चाललेल्या द्राविडी चळवळीमुळे तमिळ भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्यात यश आले आहे. त्रिभाषा सूत्रानुसार तिसऱ्या क्रमांकावर एखादी विदेशी भाषा असू शकते, असे सांगितले जाते; पण भाजप अनेक राज्यांमध्ये तिसरी भाषा म्हणून संस्कृतचा आग्रह धरत आहे, असा आरोपही एम. के. स्टॅलिन यांनी केला.  (वृत्तसंस्था)

‘तमिळ भाषेची उपेक्षा होण्याची भीती’तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, भाजपशासित राज्यात उर्दू शिक्षकांच्या ऐवजी आता संस्कृती शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. तामिळनाडूने राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्र स्वीकारले तर तमिळ या मातृभाषेची उपेक्षा होईल व भविष्यात संस्कृतचा वरचष्मा वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू