शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलच्या छितकुलमध्ये ट्रेकिंगला गेलेले 11 जण बेपत्ता, ITBP ची शोध मोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 10:21 IST

समुद्र सपाटीपासून सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेल्या लामखागा पास शिखरावर ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

किन्नौर:हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील चीन सीमेवर असलेल्या चितकुलमध्ये ट्रेकिंगला गेलेल्या 8 पर्यटकांसह एकूण 11 लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 20 हजार फूट उंचीवर असलेल्या लामखागा पास शिखरावर ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती आहे. ही टीम लामखागा पासकडे ट्रेकिंग करण्यासाठी बाहेर पडली होती, परंतु 17, 18 आणि 19 रोजी खराब हवामानामुळे ही टीम बेपत्ता झाली आहे. संघात आठ सदस्य, एक स्वयंपाकी आणि दोन मार्गदर्शक आहेत. सध्या या ट्रेकर्सचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) ची मदत मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या टीमसोबत गेलेले हिमाचलचे सहा पोर्टर पर्यटकांचे सामान सोडून 18 ऑक्टोबर रोजी चितकुलमधील रानीकांडा येथे पोहोचले. पर्यटक आणि स्वयंपाकी 19 ऑक्टोबरपर्यंत चितकुलला पोहोचतील अशी अपेक्षा होती, परंतु बुधवारी सकाळपर्यंत पर्यटक संघ आणि स्वयंपाक कर्मचाऱ्यांशी संपर्क झाला नाही. बेपत्ता झालेले 8 ट्रेकर्स दिल्ली आणि कोलकाताचे रहिवासी आहेत. हे सर्व 11 ऑक्टोबर रोजी हर्सीलहून चितकुलला निघाले होते. 19 ऑक्टोबरला तेथे पोहचणार होते, परंतु मंगळवारी ते तेथे पोहोचले नाहीत. त्यानंतर ट्रेकिंग आयोजकांनी उत्तरकाशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला याबद्दल माहिती दिली.

कोण-कोण बेपत्ता आहेत?

अनिता रावत (38), कोलकाताच्या मिथुन दारी (31), तन्मय तिवारी (30), विकास मकाल (33) सौरव घोष (34) सवियन दास (28), रिचर्ड मोंडल (30, सुकेन मांझी (43), हे पर्यटक आणि देवेंद्र (37), ज्ञानचंद्र (33), उपेंद्र (32) अशी स्वयंपाकींची नावे आहेत. ते उत्तरकाशीतील पुरोलाचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते लखवागा खिंडीजवळ अडकले आहेत. जिल्हा उपायुक्त आबिद हुसेन सादिक यांनी सांगितले की, आयटीबीपी आणि पोलीस बचाव कार्य गुरुवारी सकाळी सुरू करतील.

ITBP ची शोध मोहिम सुरूपश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणच्या आठ पर्यटकांची टीम 11 ऑक्टोबर रोजी मोरी सांक्रीच्या ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून हर्सीलला रवाना झाली होती. या टीमने 13 ते 21 ऑक्टोबर दरम्यान लामखागा खिंडीपर्यंत ट्रेकिंगसाठी वन विभाग उत्तरकाशी कडून इनर लाइन परमिट देखील घेतले होते. 17 ते 19 ऑक्टोबर या काळात खराब हवामानामुळे ही टीम भरकटली. ट्रेकिंग टीमशी कोणताही संपर्क झाला नाही. यानंतर, सुमित हिमालयन ट्रॅकिंग टूर एजन्सीने उत्तराखंड सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारला पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कळवले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTrekkingट्रेकिंगSnowfallबर्फवृष्टी