शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात मालवाहू जहाजाचे अपहरण, भारतीय नौदल सर्वात आधी मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 15:49 IST

भारतीय नौदलाचे जहाज अपहरण झालेल्या जहाजापर्यंत पोहोचले असून त्या जहाजावर बारीक लक्ष ठेवून आहे.

नवी दिल्ली :  अरबी समुद्रात चाचेगिरी रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या भारतीय नौदलाने अरबी समुद्रात माल्टा-ध्वज असलेल्या एमव्ही रुएन (MV Ruen) या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. १८ कर्मचारी असलेल्या जहाजाचे सहा जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतचा तातडीचा ​मेसेज मिळताच भारतीय नौदलाची विमाने आणि युद्धनौका समुद्री चाच्यांच्या तावडीत अडकलेल्या जहाजाच्या दिशेने पुढे सरकू लागल्या. भारतीय नौदलाचे जहाज अपहरण झालेल्या जहाजापर्यंत पोहोचले असून त्या जहाजावर बारीक लक्ष ठेवून आहे.

भारतीय नौदलाला अरबी समुद्रात अपहरण झालेल्या जहाजाचे ठिकाण सापडले आहे. अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या जहाजावर सोमालियातील (Somalia)समुद्री चाच्यांनी हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. हे जहाज सध्या सोमालियाच्या किनार्‍याकडे सरकत आहे. तसेच, अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलेल्या जहाजावर विमानातून नजर ठेवली जात आहे. परिसरातील इतर एजन्सी/एमएनएफ यांच्या सहकार्याने संपूर्ण परिस्थितीचे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

याबाबत भारतीय नौदलाने सांगितले की, नौदलाने अदनच्या खाडीत चाचेगिरीवर पाळत ठेवण्यासाठी आणि एमव्ही रूएनला शोधण्यासाठी सागरी गस्ती विमान पाठवले आहे. अपहरण होत विमानावर नजर ठेवण्यासाठी १५ डिसेंबर रोजी विमानाने उड्डाण घेतले आहे. विमानाकडून जहाजाच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. अदनच्या खाडीमध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकाने या जहाजाला एमव्ही रूएनला रोखले. इतर यंत्रणेच्या मदतीने जहाजाच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलSea Routeसागरी महामार्ग