शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हिजाब, नकाबबंदीचा कॉलेजचा निर्णय योग्यच; मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही : उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:24 IST

गणवेशाचा भाग म्हणून हिजाब, नकाब, बुरखा घालण्यास एका कॉलेजने केलेल्या मनाईच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणवेशाचा भाग म्हणून हिजाब, नकाब, बुरखा घालण्यास एका कॉलेजने केलेल्या मनाईच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला. कॉलेजच्या बुरखा, हिजाबबंदीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही. धर्म, जातीचा विचार न करता गणवेशाचा नियम विद्यार्थ्यांना लागू होतो, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नऊ विद्यार्थिनींची याचिका फेटाळली.

गणवेश शिस्त राखण्यासाठी असतो. ‘शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे’ या मूलभूत अधिकारात गणवेश ठरविण्याचा अधिकार कॉलजेला आहे, असे न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने नमूद केले. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेजने कॉलेजच्या परिसरात बुरखा, हिजाब, नकाब, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली. या निर्णयाला नऊ विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हितविद्यार्थ्यांचा धर्म उघड होऊ नये, हाच गणवेशामागचा हेतू आहे. त्यात शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांचे हित आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी, त्यांच्या करिअरसाठी त्यांनी कॉलेजमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

हिजाब अत्यावश्यक प्रथा कशी?बुरखा, नकाब, हिजाब घालणे आपल्या धर्मातील महत्त्वाची प्रथा आहे, या याचिकादारांचा दावाही न्यायालयाने फेटाळला. कन्झ-उल-इमाम आणि सुमन अबू दाऊदच्या इंग्रजी भाषांतराशिवाय इस्लाममध्ये बुरखा, नकाब, हिजाब घालणे ही अत्यावश्यक प्रथा आहे, हे दर्शविणारी सामग्री आमच्यापुढे सादर करण्यात आली नाही, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय