नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून ५०० मीटर्सच्या आत दारूची दुकाने वा बार असू नयेत, आपल्या आधीच्या आदेशात दुरुस्ती करायला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात ३१ मार्च २०१७ नंतर राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५०० मीटर्सच्या आत असलेल्या बार व दारूच्या दुकानांचे नुतनीकरण करू नये, असे आदेश सर्व राज्य सरकारांना दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून ही दुकाने व बार बंद करणे बंधनकारक आहे. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायालयापुढे आली असता, आधीच्या आदेशात कोणतेही बदल होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच महामार्गांवर दारूच्या कंपन्यांचे फलक असता कामा नयेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आदेशाचे पालन करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुख यांना दिल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘महामार्गांजवळ दारू दुकाने नकोच’
By admin | Updated: January 14, 2017 04:23 IST