महामार्गाने घेतला पुन्हा बळी ११.४० वाजेची घटना : मास्टर कॉलनीतील तरुण ठार
By admin | Updated: August 7, 2016 21:51 IST
जळगाव : शुक्रवारी रात्री महामार्गावर तीन कामगारांचा बळी गेल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा अपघात झाला. पाळधी येथे हॉटेलवर जेवण करुन जळगावकडे परत येत असताना शनिवारी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मास्टर कॉलनीतील रफीक रहिमुद्दीन शेख (वय ३०) हा तरुण ठार झाल्याची घटना महामार्गावर घडली.
महामार्गाने घेतला पुन्हा बळी ११.४० वाजेची घटना : मास्टर कॉलनीतील तरुण ठार
जळगाव : शुक्रवारी रात्री महामार्गावर तीन कामगारांचा बळी गेल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा अपघात झाला. पाळधी येथे हॉटेलवर जेवण करुन जळगावकडे परत येत असताना शनिवारी रात्री ११.४० वाजेच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मास्टर कॉलनीतील रफीक रहिमुद्दीन शेख (वय ३०) हा तरुण ठार झाल्याची घटना महामार्गावर घडली. जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मास्टर कॉलनीतील काही तरुण जेवण करण्यासाठी पाळधीकडे गेले होते. जेवण ऑटोपल्यानंतर ते रात्री मास्टर कॉलनीकडे परतत असताना मागून येणार्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यात रफीक हा ठार झाला. त्याच्या मित्रांनी त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री १२.३० वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला नोंद नव्हती.