शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील उच्च जातींतील गरिबांचे आरक्षण रद्द

By admin | Updated: August 5, 2016 04:21 IST

गुजरात सरकारने उच्च जातींमधील गरिबांसाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये लागू केलेले १० टक्के आरक्षण गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरविले.

अहमदाबाद : आनंदीबेन पटेल सरकारच्या नाकीनऊ आणणारे हार्दिक पटेलचे पाटीदार आंदोलन शमविण्यास गुजरात सरकारने उच्च जातींमधील गरिबांसाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये लागू केलेले १० टक्के आरक्षण गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरविले. त्यामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्नांत असलेल्या भाजपाची मोठी पंचाईत झाली.पाटीदार आंदोलनाच्या पाठोपाठ दलित अत्याचारांनी सर्वदूर पसरलेल्या असंतोषास आवर घालण्यासाठी आनंदीबेन यांच्याजागी नवा मुख्यमंत्री निवडण्याची भाजपाची धावपळ सुरु असतानाच उच्च न्यायालयाने हा दणका दिल्याने पक्षापुढे नवी डोकेदुखी उभी राहण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाचा हा निकाल येताच हार्दिक पटेलने पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्याचा दिलेला इशारा हा नव्या मुख्यमंत्र्यापुढील नवे आव्हान ठरेल, असे दिसते.वजनदार व्यापारी समाज असलेल्या पटेल-पाटीदारांची गुजरातमध्ये लोकसंख्या १७ टक्के आहे व हा समाज परंपरागत भाजपाचा मतदार राहिलेला आहे. यासोबत सुमारे १० टक्के असलेल्या दलित समाजावर पुढील वर्षात होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याची भाजपाची भिस्त आहे. विरोधात गेलेल्या पाटीदार-पटेल समाजाला शांत करण्यासाठी उच्च जातींमधील गरिबांसाठी आरक्षणाचा हा वटहुकूम काढला होता. दलित समाजातही असंतोष खदखदत असताना पाटीदारांना खुश करण्यासाठी योजलेल्या आरक्षणाच्या उपायाला खीळ बसल्याने भाजपाला नवी राजकीय समीकरणे शोधावी लागणार आहेत. अलीकडेच झालेल्या पंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का आधीच्या ५०.२६ टक्क्यांवरून ४३.९७ टक्क्यांवर आल्याने भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागात असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींसाठी मिळून आधीपासूनच ४९.५ टक्के आरक्षण आहे. त्याउप्पर पुढारलेल्या जातींमधील सहा लाखांहून कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांसाठी १० टक्के आरक्षण लागू करणारा वटहुकूम राज्य सरकारने काढला होता. त्यास अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुख्य न्यायाधीश न्या. आर. सुभाष रेड्डी व न्या. व्ही. एम. पंचोली यांच्या खंडपीठाने सर्व याचिका मंजूर करून १० टक्के आरक्षण रद्द केले. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद राज्यघटनेत नाही व एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही, या मुद्द्यांवर हा निकाल दिला गेला. हे आरक्षण नाही तर वर्गीकरण आहे, हा सरकारचा बचाव न्यायालयाने फेटाळला. (वृत्तसंस्था)>सरकार या निकालपत्राचा अभ्यास करून लवकरच त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेल.-नितिन पटेल, मंत्री व प्रवक्ते, गुजरात सरकारहे आरक्षण म्हणजे मूर्ख बनविण्यासाठी दिलेले लॉलिपॉप होते. ओबीसी कोट्यातून आरक्षणासाठी आमचे आंदोलन पुन्हा सुरु होईल. -हार्दिक पटेल, अध्यक्ष, पाटीदार अमानत आंदोलन समिती