शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील महत्त्वाची ठिकाणे उडवण्याची धमकी, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:35 IST

मथुरा व वाराणसीमधील मंदिरे तसेच अनेक धार्मिक स्थळे व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने दिल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

लखनौ : मथुरा व वाराणसीमधील मंदिरे तसेच अनेक धार्मिक स्थळे व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने दिल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या संघटनेने ६, ८ व १० जून रोजी या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी पत्राद्वारे दिल्याने खळबळ माजली आहे.लष्कर-ए-तोयबाच्या जम्मू-काश्मीरचा कमांडर मौलाना अंबू शेख याने हे पत्र लिहिले असून, त्यातील धमकीमुळे इंटलिजन्स ब्युरोनेलगेचच अ‍ॅलर्ट जारी केला.उत्तर प्रदेश पोलिसांनीही धमकीची गंभीर दखल घेऊ न, राज्यभरातील सर्व धार्मिक व पर्यटन स्थळे तसेच महत्त्वाची रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक तसेच रहदारीच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे.सहारणपूर व हापूड यास्टेशनांवर लगेचच प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ती दोन्हीस्टेशन आज, म्हणजे ६ जून रोजी उडवण्यात येतील, अशी धमकीत्या पत्रात आहे.इंटलिजन्स ब्युरोने २ जून रोजी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, या धमकीची माहिती दिली होती. त्यात नवी दिल्ली स्टेशनवर मिळालेल्या पत्राचा उल्लेख आहे. ते पत्र लश्कर-ए-तोयबाचे होते. अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आनंद कुमार यांनी या पत्राची सत्यता आम्ही तपासत आहोत, असे सांगितले. (वृत्तसंस्था)कसून तपासणीमथुरेतील बांके बिहारीमंदिर आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर, वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर तसेच या दोन्ही रेल्वे स्टेशनांच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.रेल्वे स्टेशनांवर तसेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश