शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

दिल्लीमध्ये अतिदक्षतेचा इशारा

By admin | Updated: January 3, 2016 16:20 IST

आपला जुना दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - आपला जुना दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. 
जैशचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याचे वृत्त असून, ते पठाणकोटप्रमाणे मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणू शकतात असा इशारा गुप्तचरयंत्रणांकडून मिळाला आहे. जैशकडून नागरीकांना ओलीसदेखील ठेवले जाऊ शकते. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. 
दिल्लीमध्ये पर्यटन स्थळ, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्तासाठी दिल्ली पोलिसांना अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. 
रविवारी सकाळी बॉम्बच्या अफवेमुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सुरक्षा तपासणी करावी लागली. त्यावेळी अनेक रेल्वे गाडया थांबवण्यात आल्या होत्या. डिसेंबर २०१५ मध्ये दिल्ली पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाकडून दहशतवादी हल्ला होऊ शकतो म्हणून  एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी संपूर्ण दिल्ली शहराला अतिदक्षेतचा इशारा देण्यात आला होता.