शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हेपेटायटिस-सी :लाखो नागरिकांची करणार काविळीसाठी मोफत तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:03 IST

सन २००२ पूर्वी ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा ज्यांनी कोणत्याही कारणाने रक्त संक्रमण करून घेतले असेल अशा नागरिकांना ‘हेपेटायटिस-सी’ या एक प्रकारच्या काविळसदृश आजाराची लागण झाली

नवी दिल्ली: सन २००२ पूर्वी ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा ज्यांनी कोणत्याही कारणाने रक्त संक्रमण करून घेतले असेल अशा नागरिकांना ‘हेपेटायटिस-सी’ या एक प्रकारच्या काविळसदृश आजाराची लागण झाली असण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा सर्व नागरिकांची तपासणी करण्याची एक मोहीम केंद्र सरकार हाती घेणार आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने ही माहिती देताना सांगितले की, सन २००२ पूर्वी रक्तपेढयांमध्ये संकलित केल्या जाणाºया व तेथून पुरविल्या जाणाºया रक्ताचे या आजारासाठी ‘स्क्रीनिंग’ करण्याची काटेकोर व्यवस्था नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी करण्यात येणार आहे.या सूत्रांनुसार ज्यांची तपासणी केली जाणे अपेक्षित आहे अशा नागरिकांची संख्या ६० लाख ते १.२० कोटी या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही तपासणी मोहीम येत्या मार्चपासून सुरु केली जाईल.ही तपासणी विनामूल्य केली जाईल व त्यात ज्यांना ‘हेपेटायटिस-सी’ची लागण झाल्याचे निष्पन्न होईल त्यांच्यावर उपचारही मोफत केले जातील, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, देशातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही तपासणी व उपचारांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. शिवाय यासाठी १०० जादा विशेष केंद्रेही सुरु केली जातील.या तपासाणीसाठी ज्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केली जाईल त्यात सन २००२ पूर्वी शस्त्रक्रिया झालेले, रक्त संक्रमण करून घेतलेले, ज्यांना वारंवार रक्त ंसंक्रमण करून घ्यावे लागते असे, एचआयव्हीची लागण झालेले, ‘एसटीआय क्लिनिक्स’मध्ये काम करणारे यांचा समावेशअसेल.या विशेष मोहिमेखेरीज नागरिकांनी वेळीच तपासणी करून उपचार करून घ्यावे व या आजारापासून होणारे मृत्यू व अस्वस्थता टळावी यासाठी सरकारने देशपातळीवर एक ‘हेपेटायटिस-सी अ‍ॅक्शन प्लॅन’ही तयार केला आहे.वर्षाला सरासरी ३५ हजार मृत्यू-पाणी व अन्नातून लागण होणारे ‘ए’ व ‘ई’रक्तातून लागण होणारे ‘बी व ‘सी’भारतात ‘हेपेटायटिस-सी’चे अंदाजे ६० लाख ते १.२० कोटी रुग्ण.या आजाराने दरवर्षी सरासरी ३५ हजार मृत्यूहेपेटायटिस-सी लक्षणे १० ते १२ वर्षांनीही दिसू शकतात.