हॅलो पान १ : साखळी शिगमोत्सवात दोन समित्यांमुळे वाद - आमदाराच्या समितीला नगराध्यक्षाचा विरोध
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
- १२ रोजी शिगमोत्सवावर बहिष्काराचा इशारा
हॅलो पान १ : साखळी शिगमोत्सवात दोन समित्यांमुळे वाद - आमदाराच्या समितीला नगराध्यक्षाचा विरोध
- १२ रोजी शिगमोत्सवावर बहिष्काराचा इशारा पणजी : साखळी शिगमोत्सवात दोन समित्यांमुळे वाद निर्माण झाला असून आमदार प्रमोद सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन काढलेल्या समितीला विरोध करीत नगराध्यक्ष धर्मेश सागलानी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी शिगमोत्सवावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत सागलानी म्हणाले की, आम्हाला दोन वेगवगेळे शिगमोत्सव झालेले नकोत, त्यामुळे समेट होत असेल तर ठीक नपेक्षा १२ रोजी शिगमोत्सवावर बहिष्कार घालू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पर्यटन खात्याने साखळीत शिगमोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेला २० फेब्रुवारीपर्यंत समिती काढण्यास सांगितले. त्यानुसार मिलिंद रेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती काढून आम्ही १९ रोजीच नावे दिली; परंतु नंतर २ मार्च रोजी आमदार प्रमोद सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन वेगळी समिती काढली. सरकार दरबारी वजन वापरून सावंत यांच्या समितीने ध्वनी परवानाही मिळवला. दोन समित्या झाल्याचे कळल्यावर पर्यटन खात्याकडे चौकशी केली असता सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितीची निवड झाल्याचे सांगण्यात आले. आमदाराने सरोज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती काढली असून तीत भाजप कार्यकर्त्यांचाच भरणा आहे. एकही नगरसेवक नाही. सागलानी म्हणाले की, गेली ६ वर्षे पालिका शिगमोत्सव साजरा करते, असे असताना आमदाराच्या हापायी पालिकेला बाजूला ठेवणे योग्य नव्हे. समिती कोणी गठित करावी याबाबत सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करायला हवीत. दरवर्षी अशाच प्रकारचा वाद होतो. राज्यात ठिकठिकाणी शिगमोत्सवाबद्दल वाद आहेत. साखळीत आम्हाला शिगमोत्सवात वाद नको; परंतु पालिकेचा आदर सरकारने राखायला हवा. एकच समिती असावी आणि अध्यक्ष आमचा असावा, असे सागलानी यांचे म्हणणे आहे. पत्रकार परिषदेस नगरसेविका कुंदा माडकर, विभाग देसाई, दामोदर घाडी, मिलिंद रेळेकर, रियाझ खान आदी नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)