हॅलो 4 : हणखणे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
By admin | Updated: August 2, 2015 23:31 IST
हणखणे : चांदेल येथील रामा गवस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली आहे. या संबंधी चांदेल हसापूर ग्रामपंचायतीला पत्र पाठवून रस्त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिल्याचे रविवारी हणखणे ग्रामसभेत उघड झाले.
हॅलो 4 : हणखणे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
हणखणे : चांदेल येथील रामा गवस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली आहे. या संबंधी चांदेल हसापूर ग्रामपंचायतीला पत्र पाठवून रस्त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिल्याचे रविवारी हणखणे ग्रामसभेत उघड झाले.सरपंच शैलजा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत इतर विषयांवरही चर्चा झाली. बैलपार येथील नव्याने बनवलेला आणि वाहतुकीला धोकादायक असलेला रस्ता तसेच पंचायतीने कामावर घेतलेले कारकून याबाबत चर्चा झाली.येथील हुतात्मा बाबू गवस हायस्कूलला आणि ग्रामपंचायतीला जमिन दान देऊनही जमीन मालकाच्या मुलांना पंचायतीने कर्मचारी पदासाठी त्यांचा विचार केला नाही. यात घोटाळा झाल्याचा आरोप सभेत झाला. यापूर्वी ग्रामसभेत या विषयावर ठराव संमत करूनही मंडळाने याचा पाठपुरावा न केला नाही. याबाबत पंचसदस्य सुधीर मळीक यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची सूचना केली.दरम्यान, बैलपार रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असताना पंचायत मंडळ त्याबाबत काहीच करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. चांदेल येथे भटक्या कुत्र्यांचा त्रास लोकांना होत असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. या वेळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ग्रामसभेत सरपंच शैलजा मळीक यांच्यासह पंच सुधीर मळीक, तुळशीदास गवस, भाग्यर्शी मळीक उपस्थित होते. निरीक्षक म्हणून यशेंद्र नाईक उपस्थित होते. त्यांना सचिव आरती सावंत यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)