शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो 2- खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष - आवेर्तान

By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST

खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष : आवेर्तान

खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष : आवेर्तान
मडगाव : कामगार प्रशासन सोपे करण्याच्या हेतूने सर्व कामगार कायद्यांमध्ये ऑनलाईन रिटर्न योजना तसेच दक्षिण गोव्यातील खलाशांसाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात खास कक्ष सुरू करण्यासंबंधी प्रयत्न सुरू असल्याची घोषणा कामगारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी केली.
दक्षिण गोवा जिल्हा पातळीवर सरकारी स्तरावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण केल्यावर ते बोलत होते. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस खात्यामध्ये 79 महिला पोलीस उपनिरीक्षक तर 221 महिला पोलीस शिपाई अशी पदनिर्मिती केल्याची माहितीही त्यांनी दिली.
या वेळी आमदार कायतू सिल्वा, आमदार बेंजामिन सिल्वा, मडगावचे नगराध्यक्ष आथरूर डिसिल्वा, जिल्हाधिकारी डॉ. सचिन शिंदे, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, मुख्याधिकारी यशवंत तावडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आवेर्तान फुर्तादो म्हणाले की, दक्षिण गोव्यामध्ये खास पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. त्यानंतर दक्षिण गोव्यातील लोकांना पासपोर्टसाठी पणजीला जाण्याची गरज भासणार नाही. कामगारवर्गाचे हित लक्षात घेऊन कामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच कामगारांचे किमान वेतन वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. कामगार प्रशासनसुध्दा सोपे करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून सर्व कामगार कायद्यांमध्ये सिंगल ऑनलाईन रिटर्न सेवा सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शांतीनगर-फोंडा येथे दरड कोसळल्यावेळी लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे फोंडा नगरपालिकेचे कामगार मंगेश खेडेकर, उद्देश गावडे व राहुल गावडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील आयोग्य केंद्र व मडगाव वाहतूक कक्षाने आयोजित केलेल्या जागृती प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली.
(प्रतिनिधी)
फोटो - आवेर्तान फुर्तादो