हॅलो 2- पाळी पोटनिवडणुकीत मंगेश गावस विजयी
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
फोटो : पाळी-कोठंबी पंचायत निवडणुकीत प्रभाग 5 मधून विजयी ठरलेल्या मंगेश गावस यांचे अभिनंदन करताना म.गो. नेते शांबा (महेश) गावस. सोबत सर्मथक. (विशांत वझे)
हॅलो 2- पाळी पोटनिवडणुकीत मंगेश गावस विजयी
फोटो : पाळी-कोठंबी पंचायत निवडणुकीत प्रभाग 5 मधून विजयी ठरलेल्या मंगेश गावस यांचे अभिनंदन करताना म.गो. नेते शांबा (महेश) गावस. सोबत सर्मथक. (विशांत वझे)डिचोली : पाळी-कोठंबी पंचायत निवडणुकीत प्रभाग 5 साठी झालेल्या निवडणुकीत मगोचे नेते शांबा (महेश) गावस यांनी या पंचायतीतील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना मंगेश लाडू गावस यांना 253 मतांनी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा पंचायत सदस्य शुभेच्छा गावस यांचे प्रभाग 5 मधील पंचायत सदस्यत्व रिक्त असल्याने ही निवडणूक घेण्यात आली होती. मंगेश गावस यांना 253 मते मिळाली, तसेच कमलाकांत गावडे यांना 115, तर र्शावणी नाईक यांना 53 मते मिळाली. शांबा (महेश) गावस यांनी पाळी पंचायत क्षेत्रात जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सिद्ध केले असून आमदार डॉ. प्रमोद सावंत यांना धक्का असल्याचे पत्रकारांना सांगितले. जनतेने कौल देताना जिल्हा पंचायत व आता या पोटनिवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. चौकट :लाटंबार्से पंचायत पोटनिवडणुकीत बबन च्यारी विजयी डिचोली : लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील प्रभाग 1 मधून बबन च्यारी यांनी 227 मते मिळवून विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा आरोलकर यांना 169 मते मिळाली. लाटंबार्से पंचायतीचे प्रभाग 1 मधील माजी पंच अनंत कानोळकर यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. आज (दि.7) झालेल्या मतमोजणीच्या वेळी मामलेदार गुरुदास देसाई, नारायण गाड व इतर कर्मचारी उपस्थित होते.