शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:15 IST

केरळमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दक्षिण व ईशान्य भारतात पावसाचा जोर कायम असून, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने प्रचंड जीवित व वित्त हानी झाली आहे. या दोन राज्यांत भूस्खलनासारख्या दुर्घटनांत आतापर्यंत अनुक्रमे ५ व ९ लोकांचा मृत्यू झाला असून, कर्नाटकात ७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, देशाच्या इतर भागांत ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या सरी पडल्या आहेत.

आसाममध्ये अनेक भागांत पूरस्थिती असून, गेल्या २४ तासांत भूस्खलनात ५ जण दगावले आहेत. सहा जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी मदत छावण्यांत हलवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिकांच्या मदतीने नागरिकांना वाचविले आहे.

अरुणाचल : भूस्खलनात वाहन वाहून गेले, ७ ठार

अरुणाचल प्रदेशात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१३वर भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका भूस्खलनाच्या घटनेत दोघे दगावले. भूस्खलनानंतर हे वाहन दरीत कोसळले. यात वाहनातील सातही जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांच्या घरात पाणी

केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, सखल भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यात हलवण्यात आले आहे. राज्याच्या उत्तर भागांत रस्ते पाण्याखाली असून, जवळपास सर्वच भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: कासरगोड जिल्ह्यात मधुवाहिनी नदीला आलेल्या पुरात रस्ते वाहून गेले आहेत. अनेक वस्त्या पाण्याखाली आहेत.

ऊन-पावसाचा खेळ

या राज्यात गेल्या चोवीस तासांत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर जैसलमेरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. किशनगंजमध्ये सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

इंडोनेशियात खाण खचल्याने १७ ठार

सायरेबॉन : इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात खोदकाम सुरू असताना एक खाण धसल्याने १७ ठार तर अनेक जण बेपत्ता झाले. सायरेबॉन जिल्ह्यातील गुनुंग कुडा खदानीत भूस्खलन झाल्याने शुक्रवारी ही दुर्घटना घडली. दोन डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत ढिगाऱ्याखालून १६ जणांचे मृतदेह व काही जखमींना बाहेर काढण्यात आले. एका जखमी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७ झाली. ६ ते ८ कर्मचारी ढिगाऱ्याखाली दबलेले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव दल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशmizoram-pcमिजोरम