शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: कर्नाटकमध्ये आगमनाच्या दिवशीच मान्सूनचा कहर; वाहतूक ठप्प; शाळांना उद्या सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:59 IST

सकाळी 9.30 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

बंगळुरू: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागून राहिलेल्या मान्सूनच्या नुसत्या आगमनामुळेच कर्नाटकला मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकमध्ये यंदा मान्सूनचे वेळेपेक्षा लवकर आगमन झाले. सोमवारी रात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी पावसाने काही वेळासाठी उसंतही घेतली होती. मात्र, 9.30 वाजल्यापासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळायला सुरूवात झाली. याचा सर्वाधिक फटका मंगळुरू शहराला बसला आहे. पहिल्याच पावसात येथील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत यंत्रणांना पाचारण करण्याची वेळ ओढावली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साठले आहे. तर मुसळधार पावसामुळे मंगळुरू विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता उद्या शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. मी स्थानिक अधिकाऱ्यांना नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला. मान्सून वेळेआधी केरळात दाखल झाल्याने सध्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस