शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 03:58 IST

‘फनी’चा कहर : पश्चिम बंगाल व बांगलादेशकडे सरकले वादळ

भुवनेश्वर : मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह फोनी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. या भयावह चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली आहे. या वादळाने आठ जणांचे बळी घेतले.पुढे वादळाचा वेग कमी झाला व ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेला सरकले. त्यामुळे तिथेही जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, मनुष्यहानीचे वृत्त नाही. बांगलादेशातील पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाले असून, तिथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.

ओडिशाचे विशेष आयुक्त बी. पी. सेठी म्हणाले की, चक्रीवादळामुळे गंजम, पुरी, खोरधा आणि गजपती या जिल्ह्यांतील १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांतील १२ लाख लोकांना ४,००० शिबिरांत हलविण्यात आले. यात ८८० तटरक्षक दलांच्या केंद्रांचा समावेश आहे. एक लाख भोजनाची पाकिटे वाटली असून, लोक शिबिरांत असेपर्यंत त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रसंगी दोन हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात येईल.

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार असून, या राज्यांना गरजेनुसार १००० कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरून शुक्रवारी दुपारी ३ ते शनिवारी सकाळी ८ पर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे ३00 हून अधिक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.

१२ लाख लोक सुरक्षित ठिकाणीप्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी ८ वाजता पुरीच्या समुद्र किनाºयावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने १२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे २०० किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.

तटरक्षक, नौदल सज्जभारतीय तटरक्षक दलाने विशाखापट्टणम, चेन्नई, गोपालपूर, हल्दिया व कोलकातामध्ये ३४ आपत्कालीन केंद्रे सुरू केली आहेत. चार जहाजेही सज्ज आहेत. नौदलाने मदत साहित्य आणि मेडिकल टीमसह तीन जहाजेही तैनात केली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हवाई सर्वेक्षणासाठी आमची विमाने तयार आहेत. फोनी हे सर्वात धोकादायक चक्रीवादळ समजले जाते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या ११ जिल्ह्यांत सर्व दुकाने, व्यवसायिक प्रतिष्ठाने, सरकारी आणि खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. शनिवारीही ती बंद राहतील.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशा