शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

याचिकांची सुनावणी मद्रास हायकोर्टातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 04:55 IST

विधानसभा अध्यक्षांनी अण्णा द्रमुकच्या ज्या १८ आमदारांना अपात्र ठरविले आहे, त्यांच्या याचिकेची सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. सत्यनारायणन यांच्यासमोर होईल

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांनी अण्णा द्रमुकच्या ज्या १८ आमदारांना अपात्र ठरविले आहे, त्यांच्या याचिकेची सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. सत्यनारायणन यांच्यासमोर होईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या अरुण मिश्रा व न्या. एस. के. कौल यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी दिला आहे.या १८ आमदारांनी अण्णा द्रमुकचे नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांची पाठराखण करुन तामिळनाडूतील आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पक्षांतरबंदी कायद्यान्वये विधानसभाध्यक्ष पी. धनपाल यांनी त्यांना गेल्या वर्षी १८ सप्टेंबरला अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका मद्रास उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात, यासाठी त्यातील काही आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातधाव घेतली होती.पक्षांतरविरोधी कायद्यान्वये विधानसभेतील अण्णा द्रमुकच्या १८ आमदारांना अपात्र ठरविणे योग्य होते का, या मुद्द्यावर मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या दोन न्यायाधीशांनी परस्परविरोधी निकाल दिले होते. त्यामुळे गोंधळहीनिर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनंतर सर्वात ज्येष्ठ असलेले न्यायाधीशएम. सत्यनारायणन यांच्यासमोर सुनावणी होईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊन हा प्रश्न तूर्तास तरी मिटविला आहे.या १८ आमदारांना विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरविल्यामुळे तेथील पलानीस्वामी सरकार टिकले आहे. त्या पक्षाकडे आता कसेबसे बहुमत शिल्लक आहे. मात्र, हे आमदार पात्र ठरल्यास पलानीस्वामी सरकार अल्पमतात जाईल आणि प्रसंगी पलानीस्वामी यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालय आता काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.