शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आरोग्यव्यवस्था कोलमडली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:58 IST

खाटा नाहीत, औषधांचा तुटवडा, जिकडे-तिकडे सायरनचा आवाज! 

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीतील आरोग्यव्यवस्था कोलमडली असून, रुग्णांना खाटा नाहीत, अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि जिकडे- तिकडे अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन कानावर धडकत असल्याने दिल्लीकर हादरले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ दिल्लीतील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत; परंतु आरोग्यसेवा किती विस्तारित करायच्या याला मर्यादा आहेत. दिल्लीतील सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नाहीत. उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या आकड्यांनुसार २८ हजार ३९५ रुग्णांची नोंद झाली, तर २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.मागच्या वर्षी दिल्लीत लॉकडाऊननंतर मजूर त्यांच्या गावी गेले. जे थांबले त्यांना ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. आता पुन्हा दिल्ली सरकार ५ हजार रुपयांची मदत करणार आहे. शिवाय, शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या मध्यान्ह जेवणाचा वापर मजुरांसाठी केला जाईल.  

उद्योगपतींचा फायदा : राहुल गांधीकेंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. ‘लसीकरणाच्या धोरणामुळे काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार असल्याचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले. केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटाबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमावणार आणि या धोरणामुळे काही उद्योगपतींचा मात्र फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या