मुख्याधिकाऱ्यांना धमकी
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
..... चौकट...
मुख्याधिकाऱ्यांना धमकी
..... चौकट...मुख्याधिकाऱ्यांना धमकीप्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत २३ ऑगस्टला प्रभाग क्र. १ फुलेनगर येथे कचराकुंडी वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना नगराध्यक्षाचे पती अशोक कुथे यांचा धमकीचा फोन आला. त्यानंतरही कचराकुंडी वाटप केल्यानंतर कार्यालयीन कामकाजावेळी नगराध्यक्ष कांचन कुथे यांनी सायंकाळी ६.१३ वाजता फोन करून धमकावले. यापूर्वी १३ जुलै, ११ ऑगस्टलासुद्धा अशाचप्रकारे धमकी देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र या धमकीमुळे मनोबल खचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निर्भय वातावरणात सक्षमपणे काम होण्यासाठी तसेच जीविताला धोका संभवू नये याकरिता पोलीस संरक्षण देण्यात यावे. धमकी देणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, अशा मागणीचे पत्र मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविले. विशेष म्हणजे, लिपिक कुथे यांना निलंबित करण्यापूर्वीचा हा प्रकार असून त्याबाबत २४ ऑगस्टलाच प्रधान सचिवांना मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले, हे विशेष!