शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 21:34 IST

Court News: दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेला तरुण पिता होऊ शकणार आहे.

दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेला तरुण पिता होऊ शकणार आहे. चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या या तरुणाच्या वीर्याचे रुग्णालयात सुरक्षित ठेवलेले नमुने त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवावेत, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने सर गंगाराम रुग्णालयाला दिले आहेत.

चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या या तरुणाच्या आई-वडिलांनी रुग्णालयात सुरक्षित ठेवलेले आपल्या मुलाच्या वीर्याचे नमुने मिळावेत, अशी विनंती रुग्णालयाकडे केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याला नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुलाच्या वीर्याचे नमुने मिळावेत यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने वरील आदेश दिले. तसेच सध्याच्या भारतीय कायद्यानुसार वीर्य देणाऱ्या दात्याची परवानगी असेल तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या वीर्यापासून प्रजननासाठी कुठलीही बंदी नाही आहे, असे स्पष्ट केले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एका आई-वडिलांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते की, त्यांच्या ३० वर्षांच्या मुलाला कर्करोगाचं निदान झाल्याने उपचारासाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केमोथेरपीमुळे पुढे पिता बनण्यात अडचणी येऊ शकतात, असे डॉक्टरांनी त्याला सांगितले होते. त्यानंतर त्याने आपले वीर्य सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर काही महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आपल्या दिवंगत मुलाचा वंश पुढे नेण्यासाठी त्याच्या वीर्याचे नमुने देण्याची मागणी रुग्णालयाकडे केली होती‌. मात्र रुग्णालयाने त्यास नकार दिला होता. आता सदर तरुणाच्या वीर्याचे नमुने त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्याचे आदेश देताना सांगितले की, जर मरणारी व्यक्ती विवाहित असती, त्याची कुणी जोडीदार असती तर प्रकरण वेगळं असतं. अशा परिस्थितीत विद्यमान कायद्यानुसार मृत्यूनंतर प्रजननावर कुठलीही बंदी नाही आहे.

टॅग्स :Courtन्यायालय