शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ अमेरिकी गेला होता धर्म प्रचारासाठीच; पालकांना लिहिलेल्या पत्रावरून झाले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 01:43 IST

अंदमान-निकोबारच्या अतिदुर्गम उत्तर सेंटिनेल बेटावरील आदिवासींनी धनुष्यबाणाने हत्या केलेला अमेरिकी पर्यटक जॉन अ‍ॅलन चाऊ ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठीच तेथे गेला होता हे त्याने अमेरिकेतील पालकांना पाठविलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : अंदमान-निकोबारच्या अतिदुर्गम उत्तर सेंटिनेल बेटावरील आदिवासींनी धनुष्यबाणाने हत्या केलेला अमेरिकी पर्यटक जॉन अ‍ॅलन चाऊ ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठीच तेथे गेला होता हे त्याने अमेरिकेतील पालकांना पाठविलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे.चाऊ याने १६ नोव्हेंबर रोजी लिहिलेले हे पत्र ब्रिटनमधील ‘दी डेली मेल.कॉम’ या आॅनलाइन वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रात जॉन याने पालकांना उद्देशून लिहिले होते, ‘...प्राण धोक्यात घालून माझे येथे येणे तुम्हाला वेडेपणाचे वाटेलही; पण या लोकांना (सेंटिनेल आदिवासींना) येशूचा संदेश पोहोचविण्यासाठी हा धोका पत्करायलाच हवा, असे मला वाटते. हे करताना माझे प्राण गेले, तर त्यांच्यावर (आदिवासींवर) किंवा देवावर रागावू नका!’‘...मी जे करतो आहे ते निरर्थक नाही. हा आदिवासींच्या सुखी आयुष्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या भाषेत प्रभूची उपासना करावी, असे बायबलमध्ये म्हटले आहे. हे आदिवासीही त्यांच्या भाषेत प्रभूची प्रार्थना करताना पाहण्यासाठी मी उतावीळ झालो आहे,’ असेही त्याने पत्रात म्हटले आहे. कुटुंबियांनी लिहिले की, इतरांसाठी तो ख्रिश्चन मिशनरी असला तरी आमच्यासाठी तो प्रिय होता.मृत्यूपूर्वी लिहिली टिपणेजॉनला या बेटावर जाण्यासाठी मदत केल्याबद्दल ज्या मच्छीमारांना अटक केली आहे त्यांच्याकडे जॉनने स्वत:च्या हस्ताक्षरांत लिहिलेली काही टिपणेही मिळाली आहेत.त्यावरून असे दिसते की, ठार मारले त्याच्या आदल्या दिवशीही जॉन, एका हातात मासा व दुसऱ्या हातात बायबल घेऊन बेटावर गेला होता व त्याही वेळी आदिवासींनी त्याच्यावर धनुष्यबाणाने हल्ला केला होता. त्याचे वर्णन जॉनने या टिपणांमध्ये केले आहे.

टॅग्स :Murderखून