शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

तो पाहतो पोलिओ वॉर्ड रिकामा होण्याचे स्वप्न , डॉ. वर्गीज यांच्या कामाचा बिल गेट्सकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:14 IST

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.

नवी दिल्ली -  दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली आहे.‘गेट््सनोट्स’ या ब्लॉगवर गेट््स यांनी ज्यांच्या कामाची महती जगभर पोहोचविली ते डॉ. वर्गीज प्रथमदर्शनी तुम्हाला डॉक्टर आहेत, असे वाटणारही नाही. कारण त्यांच्याकडे स्टेथोस्कोप नसतो. उलट त्यांच्या हातातील आयुधे पाहिली तर ते सूतार असावेत असे वाटते. रुग्णाचे अवयव किती प्रतिसाद देतात हे तपासण्यासाठी त्यांच्या हातात हातोडा असतो, रुग्णाच्या हाता-पायांची लांबी मोजण्यासाठी त्यांच्या गळ््यात टेप असते व कोनाचे नेमके मोजमाप करण्यासाठी त्यांच्यापाशी ‘गॉनिनोमीटर’ हे उपकरणही असते.गेट््स यांनी केलेल्या प्रशंसेविषयी प्रतिक्रिया विचारता डॉ. वर्गीज म्हणाले, कोतुक वा टिकेने व्यक्तिश: मी करीत असलेल्या कामात काहीच फरक पडत नाही. परंतु पोलिओग्रस्तांच्या पुनवर्सनासाठी पुढे येण्यास आणखी डॉक्टरांना व तरुणांना याने प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. डॉ. वर्गीज म्हणाले की, अवयवांत आलेले व्यंग दूर करण्यासाठी थोडीफार शस्त्रक्रिया केली व भरपूर मानसिक आधार दिला की, पोलिओग्रस्त व्यक्तीही इतर कोणाहीप्रमाणे स्वतंत्रपणे आयुष्य जगू शकते व देशाच्या विकासाला हातभार लावू शकते. त्यामुळे मी एकटा करत असलेले काम पुरेसे नाही. सरकार आणि समाजाने पोलिओग्रस्तांविषयी अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. पोलिओग्रस्तांचे पुनर्वसन हा एकच ध्यास घेऊन डॉ. वर्गीज गेली नेक वर्षे काम करत आहेत. सेंट स्टीफन्स इस्पितळातील पोलिओ वॉर्डमध्ये एकही रुग्ण न येता हा वॉर्ड पूर्णपणे रिकामा पाहण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पोलिओमुळे हात-पाय लुळे झालेल्या असंख्य स्त्री-पुरुषांच्या दृष्टीने ते जणू देवदूत आहेत. डॉ. वर्गीज यांच्यामुळे हे लोक आज कोणाच्याही मदतीशिवाय आपापले आयुष्य जगत आहेत. हे नाते कवळ डॉक्टर व रुग्णापुरते राहिले नसून ते रुग्णांच्या कुटुंबातीलच एक झाले आहेत.पोलिओ गेला, अपंगत्व राहिलेभारतातून पोलिओचे सन २०११ मध्ये उच्चाटन झाले असले तरी त्याआधी या आजाराने अवयवांनालुळेपणा आलेले हजारो लोक आजही तयचे परिणाम भोगत आहेत.सेंट स्टीफन्स इस्पितळातील आठ खाटांचा हा पोलिओ वॉर्ड १९८७ मध्ये सुरु करण्यात आला. तेव्हा देशात पोलिओचे प्रमाण खूप होते व हा वॉर्ड बहुतांश वेळा पूर्ण भरलेला असायचा.एकेकाळी सेंट स्टीफन्समध्ये वर्षाला ६००हून अधिक पोलिओग्रस्तांवर शस्त्रक्रिया व्हायच्या. आता ही संख्या वर्षाला २०० वर आली आहे.तरी डॉ. वर्गीज यांचे रिकाम्या वॉर्डचे स्वप्न साकार व्हायला आणखी बरीच वर्षे लागतील.

टॅग्स :docterडॉक्टरIndiaभारत