शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हातही अण्णांना हजारोंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:58 IST

प्रख्यात रामलीला मैदानात अण्णा हजारे यांचे १७ वे उपोषण सुरू झाले आहे. ‘अनिश्चितकालिन सत्याग्रह’ असा घोषणा फलक उपोषणाच्या व्यासपीठावर आहे. ‘सशक्त लोकपाल’, ‘सक्षम किसान’ व ‘निष्पक्ष चुनाव’ या मागण्यासांठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक येत आहेत.

नवी दिल्ली : प्रख्यात रामलीला मैदानात अण्णा हजारे यांचे १७ वे उपोषण सुरू झाले आहे. ‘अनिश्चितकालिन सत्याग्रह’ असा घोषणा फलक उपोषणाच्या व्यासपीठावर आहे. ‘सशक्त लोकपाल’, ‘सक्षम किसान’ व ‘निष्पक्ष चुनाव’ या मागण्यासांठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक येत आहेत.मैदानातील मोठ्या व्यासपीठावर अण्णा हजारे, कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे व हरयाणाचे निवृत्त न्यायाधीश प्रीतमपाल आहेत. खालील व्यासपीठावर क्रांतीगीते, देशभक्तीपर गीते गाणारे कार्यकर्ते, घोषणा देणारे युवक कार्यकर्ते आहेत. दोन्ही व्यासपीठांपलीकडच्या मंडपात देशभरातील सामाजिककार्यकर्ते आणि २०१२च्या आंदोलनातील सहभागी झालेलेलोक आहेत.व्यासपीठाच्या उजव्या व डाव्या बाजूला पोलिसांचा वेढा आहे. प्रत्येकाची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. सर्वपरिसर पोलिसांनी फुलून गेला आहे. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे.आंदोलनाच्या पहिल्यादिवशीच वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्या आंदोलकांमुळे व्यासपीठासमोरील मंडप भरून गेला होता. तिरंगा घेतलेले काही कार्यकर्ते होते. उन्हातही उत्साहीस्त्री-पुरुष कार्यकर्ते मंडपात शांतपणे बसून होते. ‘आंदोलन’असे लिहिलेल्या टोप्या त्यांनी परिधान केल्या होत्या.लोकपालची सरकारला भीतीआंदोलकांच्या बसगाड्या पोलिसांनी ठिकठिकाणी रोखल्याचा आरोप अण्णांसह संतोष हेगडे, प्रीतम पाल, शिवकुमार कक्का यांनी केला. प्रीतमपाल यांनी अण्णांचा उल्लेख ‘भारतवर्ष के सबसे बडे समाजसेवक’ असा केला.संतोष हेगडे म्हणाले की, १९६४ पासून लोकायुक्त व लोकपाल या संस्था सशक्त करण्यासाठी मागणी केली जात आहे. २०१२ मध्ये अण्णांनी आंदोलन करूनही लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी केली गेली नाही, कारण सरकारला लोकपाल संस्थेची भीती आहे.कार्यकर्त्यांनीच केली पाण्याची व्यवस्था :रामलीला मैदानामध्ये पाण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे अण्णांच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगत उन्हाचा त्रास होत असला तरी तो सहन करा, असे आवाहन केले. त्यामुळे तहानलेल्या मंडळींना पाण्याच्या प्रतीक्षेतच राहावे लागले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे