शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन व्हिसासाठी करावी लागेल प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 11:19 IST

८ नोव्हेंबरपासून भारतातील अंदाजे तीन दशलक्ष व्हिसाधारक लसीकरणाच्या पुराव्यासह नव्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास धोरणाअंतर्गत अमेरिकेत प्रवास करू शकतील, असेही दूतावासाने म्हटले.

नवी दिल्ली : काही कामांसाठी तात्पुरत्या स्वरूपात अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांना व्हिसासाठी (नॉन इमिग्रंट व्हिसा कॅटॅगरीज) अपॉईंटमेट मिळण्यास मोठी प्रतीक्षा करावी लागेल, असे अमेरिकेच्या येथील दूतावासाने म्हटले. या विलंबाचे कारण हे कोविड-१९ मुळे आलेले अडथळे होत. ८ नोव्हेंबरपासून भारतातील अंदाजे तीन दशलक्ष व्हिसाधारक लसीकरणाच्या पुराव्यासह नव्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास धोरणाअंतर्गत अमेरिकेत प्रवास करू शकतील, असेही दूतावासाने म्हटले.

“वैध मार्गांनी प्रवास करणाऱ्यांना मदत करणे हे उभय देशांतील द्विपक्षीय संबंध बळकट करून वाढवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोविड-१९ मुळे जे अडथळे आले, त्यामुळे काही नॉन इमिग्रंट व्हिसा कॅटॅगरीजसाठी आमचा दूतावास आणि वकिलातीत जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे दूतावासाने म्हटले. “अर्ज करणारे आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही क्षमता वाढवण्याचे काम करीत होतो तेव्हा लोकांनी जो संयम दाखवला, त्याबद्दल दूतावास आभारी आहे.”

अपवादात्मक परिस्थितीत लागणार नाहीत पुरावे लसीकरणाच्या गरजेबद्दल दूतावासाने म्हटले की, ८ नोव्हेंबरपासून अमेरिकेत येणाऱ्या विदेशी प्रवाशांसाठी कोविड-१९ चे पूर्ण लसीकरण अत्यावश्यक आहे. या प्रवाशांना अमेरिकेत येणाऱ्या विमानात प्रवेश करण्याच्या आधी लसीकरण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.  या पुराव्यासाठी मोजके अपवाद आहेत. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) ज्या लसी मान्य केल्या आहेत, त्यात एफडीएने प्राधिकृत केलेली तसेच डब्ल्यूएचओने इमर्जन्सी यूज लिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या लसी स्वीकारल्या जातील.  जागतिक आरोग्य संघटनेच्या इमर्जन्सी युज लिस्टमध्ये कोविशिल्डचा समावेश असल्यामुळे अमेरिकेत प्रवेशासाठी ही लस स्वीकारली जाईल, असे दूतावासाने म्हटले.

टॅग्स :Americaअमेरिका