शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

नामंजूर! अर्जात जातीचा उल्लेख करणार नाही, केरळमधल्या एक लाख मुलांचा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 21:51 IST

जातीय व्यवस्थेवर समाजात अनेकदा चर्चा केली जाते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांकडून मोर्चेही काढले जातात. परंतु केरळमधल्या जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्षतेचं अनोख उदाहरण समोर ठेवलं आहे.

केरळ- जातीय व्यवस्थेवर समाजात अनेकदा चर्चा केली जाते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांकडून मोर्चेही काढले जातात. परंतु केरळमधल्या जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्षतेचं अनोख उदाहरण समोर ठेवलं आहे. एका शैक्षणिक सत्रात जवळपास एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जाती आणि धर्माचा उल्लेख करण्याचं टाळलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमधल्या सरकारी आणि निमसरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्षं 2017-18साठी सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या शैक्षणिक सत्रात जवळपास 1.23 लाख मुलांनी जाती आणि धर्म सांगण्यास नकार दिला आहे. पहिल्या इयत्तेपासून दहावीच्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सत्रात सहभाग घेतला होता. राज्याचे शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ यांनी केरळ विधानसभेत याची माहिती दिली. 

ते म्हणाले, धर्म आणि जात सांगण्यास नकार देणा-या विद्यार्थ्यांची संख्या यंदाच्या वर्षात जास्त आहे. राज्यातील 9202 इतक्या सरकारी आणि निमसरकारी शाळांमधून या विद्यार्थ्यांचा आकडा प्राप्त झाला आहे. केरळमधल्या प्रत्येक शैक्षणिक सत्रात विद्यार्थी धर्म आणि जातीचा उल्लेख करणं टाळतात. केरळचे सार्वजनिक शिक्षण संचालक मोहनकुमार यांनीही याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना स्वतःची जात सांगणं सक्तीचं नाही. त्यामुळे कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना जात सांगण्यासाठी दबाव आणू शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनीही स्वतःच्या जाती-धर्माचा उल्लेख केलेला नाही, असंही मोहनकुमार म्हणाले आहेत. जवळपास 1.23 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जावर जाती-धर्माचा रकाना रिकामी ठेवला आहे. केरळमध्ये सीपीएमचे आमदार डी. के. मुरली यांनी विधानसभेत याबाबत माहिती मागितली होती. त्यावेळी मुरली यांना केरळचे शिक्षणमंत्री यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. 

टॅग्स :Keralaकेरळ