शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुले जीवानिशी गेली, कुटुंबांना दु:ख आवरेना; CBI चौकशी करण्यासाठी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 07:49 IST

हाथरसच्या चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये मुले आणि महिला अधिक, चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

हाथरस : ‘सत्संग’ आटोपून सत्येंद्र यादव हा आपल्या वाहनाकडे जात असताना त्यांच्या पत्नीने त्यांना रडत रडत फोन करून सांगितले की, काही वेळापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ‘छोटा’ मरण पावला आहे.

पेशाने ड्रायव्हर असलेला २९ वर्षीय यादव हा आपल्या आई आणि दोन वहिनी आणि कुटुंबासह विश्वहारी सत्संगासाठी दिल्लीहून आला होता. कार्यक्रम संपण्यापूर्वीच, तो, त्याची आई आणि मोठा मुलगा मयंक (४ वर्षीय) सोबत वाहनाकडे गेले होते. मात्र त्याच्या पत्नीने फोनवर मुलगा गेल्याचे सांगताच त्याला मोठा धक्का बसला.

रोविनच्या कुटुंबाप्रमाणेच इतर अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी या दुःखद घटनेत आपली मुले गमावली आहेत. भाऊ, बहिणीचा शेवटचा प्रवासआयुष (९) आणि काव्या (३) नावाच्या भाऊ आणि बहिणीसाठी, जयपूर ते कार्यक्रमस्थळापर्यंतचा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. त्यांच्या वडिलांना अद्याप ही बातमी सांगितलेली नाही. त्यांना मोठा आघात होईल, अशी भीती असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

बहिणीच्या शोधासाठी...चेंगराचेंगरीनंतर राकेशकुमार याची बहीण हरबेजी देवी या बेपत्ता आहेत. त्याने सांगितले की, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या १००हून अधिक लोकांचे मी मृतदेह बघितले; पण त्यातूनही माझ्या बहिणीचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी आपल्या बहिणीच्या शोधासाठी हाथरस, इटाह, अलिगढ येथील शवागारेही पालथी घातली. मात्र तिथेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

मृत्यू नेमका कशामुळे?चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जवळपास सर्व प्रकरणांमध्ये गुदमरणे हे मृत्यूचे कारण असल्याचे आढळून आले आहे. मृतांमध्ये बहुतांश ४० ते ५० वयोगटातील महिला आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. 

चेंगराचेंगरी का?‘भोले बाबा’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुयायांना धक्का दिल्याने गोंधळ उडाला. पावसामुळे तेथे निसरडा उतार झाला होता, यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे (एसडीएमच्या अहवालातून समोर आले आहे. बाबांच्या पायाची धूळ त्यांच्या कपाळावर लावायला भक्तांनी सुरुवात केली, इतरही भक्त त्यांच्याकडे धावू लागले. यावेळी बाबांचे वैयक्तिक ब्लॅक कमांडोेंनी धक्काबुक्की केली. यात काही लोक खाली पडले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि जमाव नियंत्रणाबाहेर गेला. बहुतेक लोक उतारामुळे घसरले आणि पडले. जे पडले ते उठू शकले नाहीत आणि मागून येणाऱ्या लोकांमुळे ते चिरडले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.