शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : "अन्यायाविरोधात उभे राहणार, न्याय मिळेपर्यंत लढणार" राहुल-प्रियंकांचा हुंकार

By बाळकृष्ण परब | Updated: October 3, 2020 20:58 IST

Rahul Gandhi & Priyanka Gandhi in Hathras : आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

ठळक मुद्देहाथरसमधील पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा राहीलआम्ही अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे अपयशी

हाथरस (उत्तर प्रदेश) - हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबाची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या भेटीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाकडून झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, असा हुंकार राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटंबाची भेट घेतल्यानंतर केले.पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या की, हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा राहील. आम्ही अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार. न्याय झाला नाही तर ते आम्हाला रोखू शकत नाहीत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तर आपल्याला न्याय हवाय अशी मागणी पीडित कुटुंबाने आमच्याकडे केली आहे. तसेच या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना अटकाव करत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर या कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधी यांच्याही भावनांना बांध फुटला.गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले होते. यानंतर दोघेही हाथरससाठी रवाना झाले असून प्रियंका गांधी स्वत: गाडी चालवत आहे. तर राहुल गांधी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे दिसून आले होते.ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती आमची मुलगी नाही, पीडितेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा  उत्तर प्रदेशातल्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून उत्तर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व गावात येणारे रस्ते पोलिसांनी सील करून नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतले, त्यावेळी कुटुंबाने खळबळजनक आरोप केला की, पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पीडित कुंटुंबाला पीडित मृत मुलीचा चेहरा न दाखवताच परस्पर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यामुळेच आणखी या घटनेबाबत देशात संताप निर्माण झाला. 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश