शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Case: एसआयटीला अहवालासाठी दहा दिवस मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 03:29 IST

Hathras Case: मुख्य आरोपी व दलित मुलीच्या कुटुंबियांतील कथित फोन कॉल उघड

लखनौ : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करण्याकरिता एसआयटी पथकाला त्याचा अहवाल सादर करण्यास आणखी १० दिवसांची मुदत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने दिली आहे.एसआयटीने केलेल्या प्राथमिक तपासाच्या आधारे योगी आदित्यनाथ सरकारने पोलीस अधीक्षक व आणखी चार अधिकाऱ्यांना याआधीच निलंबित केले आहे. उत्तर प्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पथकात पोलीस उपमहासंचालक चंद्रप्रकाश, आयपीएस अधिकारी पूनम या सदस्यांचाही समावेश आहे. हाथरस प्रकरणातील आरोपी, बलात्कार पीडितेचे नातेवाईक व अन्य संबंधित व्यक्तींची लायडिटेक्टर चाचणी घेण्यात यावी अशी शिफारस एसआयटी पथकाने केली आहे.हाथरस बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी व दलित मुलीचे कुटुंबीय यांच्यात फोनवरून नेहमी संभाषण होत असे आता उघड झाले आहे. मात्र, अशा कथित कॉलवर व त्यातील तपशिलावर आमचा काडीमात्र विश्वास नाही असे बलात्कार पीडितेच्या भावाने सांगितले. माझ्या वडिलांकडे फोन असला तरी आमचे संदीपशी कधीही बोलणे झाले नाही. माझी बहीण तर अशिक्षित होती. तिला मोबाईल फोन हाताळता येत नव्हता. त्यामुळे मुख्य आरोपीशी आम्ही बोलायचो या आरोपात तथ्य नाही, असेही बलात्कार पीडितेच्या भावाने सांगितले.जातीय दंग्यासाठी १०० कोटींहून अधिक निधी?हाथरस बलात्कार प्रकरणाचे निमित्त करून उत्तर प्रदेश व देशात जातीय दंगे घडविण्यासाठी मॉरिशसमधून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी पुरविण्यात येणार होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. त्यातील ५० कोटी रुपये पीपल्स फ्रंट आॅफ इंडिया या संस्थेकडे पाठविण्यात आले होते.हाथरसमध्ये दंगल घडविण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी याआधीच मेरठमधील चार लोकांना अटक केली होती. ते पीपल्स फ्रंट आॅफ इंडिया या संस्थेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार