शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Case: खोट्या गोष्टींत गोवण्याचा पोलिसांचा डाव; दलित मुलीच्या कुटुंबियांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:53 IST

Hathras Case: दलित मुलीच्या एका भावाने यासंदर्भात सांगितले की, आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. त्याचसाठी खोट्या फोन कॉलचा हवाला देऊन प्रकरणाला वेगळा रंग दिला जात आहे.

हाथरस : हाथरस येथील दलित मुलीवर बलात्कार करणाऱ्यांपैकी मुख्य आरोपीच्या संपर्कात आपण कधीही नव्हतो, असे या मुलीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. खोट्यानाट्या गोष्टीत आम्हाला गोवण्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा डाव आहे, असा आरोप बलात्कारपीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. गेल्या पाच महिन्यांत मुख्य आरोपी संदीप ठाकूर व या कुटुंबियांमध्ये दूरध्वनीवर १०० कॉलदरम्यान बोलणे झाल्याची माहितीही खोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दलित मुलीच्या एका भावाने यासंदर्भात सांगितले की, आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. त्याचसाठी खोट्या फोन कॉलचा हवाला देऊन प्रकरणाला वेगळा रंग दिला जात आहे.आमच्या घरी वडिलांनी १० वर्षांपूर्वी मोबाईल घेतला; पण त्याचे सीमकार्ड माझ्या नावावर आहे. आमच्याकडे एकच फोन असून, तो नेहमी घरात ठेवलेला असतो. माझे वडील तो फोन सर्वात जास्त वापरतात; पण बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूरशी फोनवरून आपण कधीही बोललेलो नाही, असे माझ्या वडिलांनी सांगितले आहे.मुख्य आरोपी संदीप व दलित मुलीच्या कुटुंबातील लोकांचे फोनवरून झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ फिती व्हायरल झाल्या आहेत. दलित मुलीच्या धाकट्या भावाने सांगितले की, पीडित मुलगी अशिक्षित असून, तिला मोबाईल कसा हाताळायचा हेही माहीत नव्हते. ती मोबाईलवरून कॉल करायची नाही, तर आलेले कॉल घ्यायची. त्यामुळे तिने मुख्य आरोपी संदीप याला फोन केला असण्याची शक्यताच नाही, असेही तिच्या धाकट्या भावाने म्हटले आहे.‘त्या’ मुलीशी माझी मैत्री त्यांना नापसंत : आरोपी संदीपजिच्यावर बलात्कार झाला, असे म्हटले जाते, त्या दलित मुलीबरोबर असलेल्या माझ्या मैत्रीला तिच्या घरच्या मंडळींनी खूप विरोध केला होता, असे या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.मला आणि आणखी तिघांना विनाकारण या बलात्कार प्रकरणात गोवण्यात आले आहे. आम्हा चौघांनाही न्याय मिळावा, अशी मागणी मुख्य आरोपी संदीप याने केली आहे. या मुलीला तिची आई व मोठा भाऊ, हे दोघेही त्रास देत होते, असा दावाही संदीपने केला आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार