शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"छत्तीसगडचे मुख्यमंत्री राक्षस आहेत आणि त्यांना भगव्यामध्ये दोष दिसतो", अनिल विज यांची भूपेश बघेल यांच्यावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 18:37 IST

Anil Vij : प्रत्येक युगात देवता आणि दानव असतात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे आजचे राक्षसी स्वभावाचे महान व्यक्तिमत्व आहे, असेही अनिल विज म्हणाले.

हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर निशाणा साधला आहे.  छत्तीसगडचे मुख्यमंत्री राक्षस आहेत आणि त्यांना भगव्यामध्ये दोष दिसतो, असे विधान अनिल विज यांनी केले आहे. तसेच, भूपेश बघेल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. प्रत्येक युगात देवता आणि दानव असतात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे आजचे राक्षसी स्वभावाचे महान व्यक्तिमत्व आहे, असेही अनिल विज म्हणाले.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भगव्यामध्ये खूप दोष दिसतो, पण जेव्हा दिवस उगवतो तेव्हा तो भगवाच असतो आणि जेव्हा रात्र होते तेव्हाही भगवाच असतो, असे म्हणत अनिल विज यांनी त्यांच्यावर टीका केला. ते म्हणाले, "तिरंग्याच्या शीर्षस्थानी भगवा ठेवण्यात आला आहे. त्यात त्यांना दोष दिसतो. ज्या पदासाठी तिरंग्यासमोर शपथ घेतली होती, त्या पदाचा तात्काळ राजीनामा त्यांनी दिला पाहिजे."

दरम्यान, हा सगळा गोंधळ शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटापासून सुरू झाला आहे. पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे, भूपेश बघेल यांनी हिंदू संघटनांवर ताशेरे ओढताना सांगितले की, ज्यांनी घर, कुटुंब आणि समाजाचा त्याग केला आहे, तेच भगवे परिधान करतात, परंतु भगव्या रंगाची वस्त्रे परिधान करून बाहेर पडलेल्या बजरंगी गुंडांनी काहीही त्याग केले नाही. उलट वसूली करण्यासाठी भगवा परिधान करत आहेत.

"...आम्ही सीमेच्या आतल्या शत्रूंचा सामना करू"यापूर्वी अनिल विज यांनी तवांगमधील हिंसक चकमकीवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही टीकास्त्र सोडले होते. तेव्हा अनिल विज म्हणाले होत की, "या घटनेनंतर चीनकडून एकही वक्तव्य आलेले नाही, मात्र भारतात बसलेल्या चीनच्या प्रतिनिधींचीच विधाने येत आहेत. त्यामुळे मी लष्कराला सांगेन की, तुम्ही सीमेपार असलेल्या शत्रूंशी सामोरे जा आणि आम्ही सीमेच्या आतल्या शत्रूंचा सामना करू."

टॅग्स :Anil Vijअनिल विजHaryanaहरयाणाChhattisgarhछत्तीसगड