शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा निवडणूक 2019: मुख्यमंत्री खट्टर यांनी सायकलवरून जात केलं मतदान, हुड्डांकडून पूजा-अर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 14:42 IST

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

चंदीगडः हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. करनालमधल्या प्रेमनगर इथल्या बूथ क्रमांक 174वर सीएमनी सायकलवरून येत मतदान केलं आहे. त्यानंतर त्यांनी जनतेला शांततेत मतदान करण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे हुड्डा यांना मतदान करण्यापूर्वी पूजा-अर्चा केली आहे. तसेच बहारदूरगडमधल्या झज्जर रोडवरच्या फाऊंडेशन स्कूलमधल्या मतदान केंद्राबाहेर काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.दोन्ही गटांना वेगवेगळे करून पोलिसांनी जमावाला शांत केलं. निवर्तमानचे आमदार आणि भाजपा उमेदवार नरेश कौशिक यांचे भाऊ, पुतणे आणि भाच्यावर मारहाण आणि धमकी देण्याचे आरोप करण्यात आले आहेत. दुसरीकडे जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी आपल्या कुटुंबीयांसह सिरसा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी दुष्यंत चौटाला हे ट्रॅक्टर चालवत मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासोबत नैना चौटाला आणि मेघना चौटाला उपस्थित होत्या.सोनाली-योगेश्वर दत्त यांनी केले मतदानहरयाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी सकाळी आठ वाजत हिसार येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तसेच, टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी आदमपूरमध्ये मतदान केले. सोनाली फोगाट या आदमपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप विश्नोई रिंगणात उतरले आहेत. याशिवाय, ऑलिम्पिकपटू योगेश्वर दत्त सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. योगेश्वर दत्तला भाजपाने उमेदवारी दिली आहे. योगेश्वर दत्त याने बारौदामध्ये मतदान केले. त्याच्या विरोधात काँग्रेसचे कृष्ण हुड्डा निवडणुक लढवत आहेत.गीता-बबिता फोगाट यांनी बजावला मतदानाचा हक्कमहिला कुस्तीपट्टू बबिता फोगाट आणि गीता फोगाट यांनी आपल्या कुटुंबीयांसह चरखी दादरी मतदारसंघात असलेल्या बलाली गावात मतदान केले. बबिता फोगाट भाजपाच्या उमेदवार आहेत. चरखी दादरी मतदारसंघातून बबिता फोगाट यांच्याविरोधात काँग्रेस नेता नृपेंद्र सिंह सांगवान आणि जेजेपीचे नेते सतपाल सांगवान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून या निवडणुकीत 1169 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूक