शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

"हा 'आप'चा कार्यकर्ता आहे, त्याला मारहाण करून हाकलून द्या"; हरियाणाचे मुख्यमंत्री संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 09:23 IST

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते वादात सापडले आहेत.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादात सापडले आहेत. सिरसा येथे आयोजित केलेल्या 'जनसंवाद कार्यक्रमात' मुख्यमंत्री व्यसनमुक्तीबाबत सूचना मागवत होते. याच दरम्यान, एका व्यक्तीने त्यांना सवाल विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून संबोधले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याला मारहाण करून बाहेर काढण्याचे आदेश दिले.

व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, "आम्ही अंमली पदार्थांचे व्यसन कमी करण्यासाठी खूप काम केले आहे, त्यामुळे अमली पदार्थांचे व्यसन कमी करण्यासाठी काय करायला हवे याविषयी एक-दोन सूचना, कोणी देऊ शकत असेल तर सांगा." दरम्यान, एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, त्यानंतर त्यांचा संयम सुटला आणि म्हणाले, 'मित्रांनो राजकारण करू नका, हा राजकारण करणारा आहे. आपचा कार्यकर्ता आहे. त्याला उचला, मारा आणि बाहेर काढा..."

सुरक्षा कर्मचारी त्या व्यक्तीला उचलून बाहेर काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, दुसरी घटनाही सिरसा येथील आहे, जिथे तक्रार घेऊन पोहोचलेल्या महिलेला मुख्यमंत्री म्हणत आहेत, "थांब, थांब जरा, तुला कुठून तरी शिकवून पाठवलं आहे, गप्प बस आता." हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या दोन्ही व्हिडीओवरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत.

दोन्ही घटना सिरसाच्या जाहीर सभेत घडल्या. सार्वजनिक संवादादरम्यान, लोक त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्री खट्टर यांच्याशी शेअर करतात आणि ते अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या जागेवर सोडवण्याचे निर्देश देतात. आता मुख्यमंत्र्यांचा संयम सुटल्याचे दोन व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. आम आदमी पक्षाने या दोन्ही घटनांबाबत सीएम खट्टर यांच्यावर टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.