शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 07:58 IST

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे.

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४२ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, १० टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. १,१३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार ४८१ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर ११७ उमेदवारांवर गुन्हे आहेत.

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे. यावेळी हरयाणा विधानसभेची निवडणूक एकूण ७४ राजकीय पक्ष लढवीत आहेत. २०१४ मध्ये ४३ राजकीय पक्षांनी उमेदवार उतरविले होते. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत असून, ७४ राजकीय पक्षांचे एकूण १,१६९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. २०१४ ची निवडणूक ४३ पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढविली होती.

यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कोट्यधीश ४८१ उमेदवारांची एकूण संपत्ती सरासरी ४ कोटी ३१ लाख रुपये आहे. याचाच अर्थ ४२ टक्के उमेदवारांनी आपली संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. राजकीय पक्षनिहाय काँग्रेसचे ७९, भाजपचे ७९, जेजेपीचे ६२, आयएनएलडीचे ८० आणि बसपाचे ३४ उमेदवार कोट्यधीश आहेत.

गुन्हे असलेले ११७ उमेदवारयावेळी निवडणूक लढविणांऱ्यापैकी १० टक्के म्हणजे ११७ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती दिली आहे. ७० उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. यात काँग्रेसचे २२, भाजपचे ४, जजपाचे १६, आयएनएलडीचे १२ आणि बसपाच्या २१ उमेदवारांचा समावेश आहे.

निरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार रिंगणातनिरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत असून, ५७४ उमेदवार ५ वी आणि १२ वी उत्तीर्ण आहेत. ४८४ उमेदवार पदवीधर किंवा अधिक शिक्षित आहेत. ३५ उमेदवार पदविकाधारक असून, १९ उमेदवार साक्षर असून, २५ निरक्षर आहेत. उमेदवारांचे वयोमान २५ ते ८० वर्षांदरम्यान आहे.बेरोजगारीवर भाजप गप्प का?चंदीगड : बेरोजगारीसारख्या ज्वलंत मुद्यावर भाजप का गप्प आहे? असा सवाल जनता भाजपला विचारत आहे. जनतेने भाजपला यावेळी बाहेरचा रस्ता दाखविण्याचा चंग बांधला आहे, असा दावा हरयाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी केला आहे.खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अनेक घोटाळ्यांत अडकले आहे. अनुच्छेद ३७० ला भाजप निवडणुकीत मोठा मुद्दा बनविला आहे. यावर त्या म्हणाल्या की, हा डाव त्यांच्यावर उलटेल. कारण बेरोजगारीसारख्या मुद्यांवर भाजप मूग गिळून का? असा सवाल जनता विचारत आहे. हरयाणात काँग्रेसचे सरकार येईल, अशी ठाम आशा आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक