शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:17 IST

Haryana Assembly Election : उपमुख्यमंत्री असताना दुष्यंत चौटाला यांनी महिलांच्या मान-सन्मानात कधीही कमीपणा येऊ दिला नाही, असेही नैना चौटाला म्हणाल्या.

Haryana Assembly Election : चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धामधून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर जननायक जनता पक्ष (जेजेपी) आणि आझाद समाज पक्ष (कांशीराम) या युतीचे सरकार स्थापन झाल्यास हरियाणातील गर्भवती महिलांसाठी 'लाडली बेबी योजना' लागू करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच, या योजनेंतर्गत गरोदर महिलांची काळजी आणि आहारासाठी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधनही दरमहा २१ हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात जेजेपीच्या ज्येष्ठ नेत्या आणि आमदार नैना सिंह चौटाला यांनी घोषणा केली.

नैना चौटाला शनिवारी उचाना येथील अलेवा गावात आयोजित हरी चुनरी चौपाल कार्यक्रमात जमलेल्या महिलांना संबोधित करत होत्या. त्यावेळी, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जेजेपीने पंचायत राज संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण लागू केले होते आणि आता आमचे सरकार आल्यास शिक्षक भरतीतही महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल, असे नैना चौटाला यांनी सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री असताना दुष्यंत चौटाला यांनी महिलांच्या मान-सन्मानात कधीही कमीपणा येऊ दिला नाही, असेही नैना चौटाला म्हणाल्या.

याचबरोबर, महिलांनी एकजूट होऊन उचाना येथून दुष्यंत चौटाला यांना विजयी करा आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी राज्यभरात चावी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, असे नैना चौटाला म्हणाल्या. तसेच, एकीकडे जेजेपी महिलांना सोबत घेऊन पुढे जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते बीरेंद्र सिंह यांनी महिलांना वांझ म्हणत आईच्या गर्भाचा अपमान केला आहे. महिलांना वांझ असा दर्जा देणारे काँग्रेसवाले कधीच महिलांना सन्मान देऊ शकत नाहीत, त्यामुळे महिलांनी मतदान करूनच आपल्या अपमानाचा बदला घ्यावा, असे नैना चौटाला म्हणाल्या.

७५ टक्के रोजगाराचा कायदा करण्यात आला होता नैना चौटाला म्हणाल्या की, दुष्यंत चौटाला यांनी ७५ टक्के रोजगाराचा कायदा तरुणांच्या हितासाठी केला होता, मात्र भाजपने त्यात वारंवार अडथळे आणले. तसेच, चौधरी देवी लाल यांनी १०० रुपयांपासून सुरू केलेली वृद्धापकाळ पेन्शन आज दुष्यंत चौटाला यांनी ३,००० रुपये प्रति महिना केली.  उचाना येथील जनतेने नेहमीच दुष्यंत चौटाला यांना आपला लाडका मानून पुढे नेण्याचे काम केले आहे आणि दुष्यंत चौटाला यांनाही नेहमीच हरियाणा आणि उचानाच्या विकासाचा विचार केला आहे, असे नैना चौटाला यांनी सांगितले.

टॅग्स :Haryanaहरयाणा