महाराजगंज (उ.प्र.) : ‘हारवर्ड’पेक्षा ‘हार्डवर्क’ अधिक जोरकस असते, असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीवर टीका करणाऱ्या नोबेल विजेते प्रा. अमर्त्य सेन यांच्यासारख्या अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात शिकलेल्या व शिकविणाऱ्या अर्थतज्ज्ञांना गर्भित टोला लगावला.‘हेकेखोर राज्यकर्त्यांनी उचललेल्या नोटाबंदीसारख्या पावलाने विश्वासावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाला घातला आहे’, अशी टीका अमर्त्य सेन यांनी केली होती. सरकारने मंगळवारी डिसेंबर अखेरच्या तिमाहीसाठीची विकासदराची अधिकृत आकडेवारी जाहीर केली होती. त्यावरून नोटाबंदीचा फारसा परिणाम न होता भारताचा वृद्धिदर या तिमाहीत थोडासा मंदावूही ७ टक्के राहिला व अजूनही भारत ही जगातील सर्वात वेगवान विकास करणारी अर्थव्यवस्था आहे, असा दावा सरकारने केला होता. प्रचारसभेत मोदी म्हणाले की, एकीकडे हारवर्डवाल्यांची री ओढणारे लोक (नोटाबंदीचे टीकाकार) आहेत तर दुसरीकडे काबाडकष्ट करून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभार लावणारे आहेत. (वृत्तसंस्था)
‘हारवर्ड’पेक्षा ‘हार्डवर्क’ जोरकस - मोदी
By admin | Updated: March 2, 2017 04:13 IST