शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

हार्दिक पटेल स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2015 00:55 IST

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सुरू झालेले मोठे आंदोलन दडपण्याचा चंग गुजरातेतील भाजपा सरकारने बांधल्याचे शनिवारी पुरते स्पष्ट झाले.

अहमदाबाद : पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सुरू झालेले मोठे आंदोलन दडपण्याचा चंग गुजरातेतील भाजपा सरकारने बांधल्याचे शनिवारी पुरते स्पष्ट झाले. पटेल आरक्षण आंदोलनाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी शनिवारी त्यांच्या ३५ समर्थकांसह स्थानबद्ध केले. दरम्यान, रात्री उशिराने हार्दिक आणि त्यांच्या समर्थकांना बिनाशर्त जामिन देण्यात आला. गुजरात सरकारने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यभरातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद केली. प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय एकता यात्रा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कारण पटेल यांच्या स्थानबद्धतेसाठी देण्यात आले होते. सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, कायदा व्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. कारण या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती. दांडी-अहमदाबाद मोर्चाची परवानगी न मिळाल्याने त्यांनी रॅलीबाबत कालपर्यंत गोपनीयता बाळगली होती. (वृत्तसंस्था)अफवा पसरू नयेत म्हणून...कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासोबतच कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी संपूर्ण गुजरातमधील मोबाइल, इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक पी.सी. ठाकूर यांनी दिली. सुरतमध्ये हार्दिक यांना ताब्यात घेताच पोलिसांनी २४ तास मोबाइल, इंटरनेट सेवेवर निर्बंध घालण्याबाबत अधिसूचना काढली.आमचा आवाज चिरडण्याचा गुजरात सरकारचा डाव आहे. त्यांना आमच्यावर अत्याचार करायचे आहेत. राज्यात हिंसाचार माजावा अशी पोलीस आणि सरकारची इच्छा आहे. ही कारवाई लोकशाही भावनेच्या विरोधात आहे.- हार्दिक पटेल