शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

मोदी सरकारपुढे लोकपाल निवडीचे महाकठीण काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया पार पडल्यास तो ठरेल चमत्कार!

- हरीश गुप्तानवी दिल्ली : देशाच्या पहिल्या लोकपालाची निवड करण्याचे काम हे मोदी सरकारसाठी खूपच गुंतागुंतीचे व मोठे आव्हान ठरणार आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या आधी लोकपाल मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि ख्यातनाम विधिज्ञ मुकुल रोहटगी यांचा समावेश असलेल्या लोकपाल निवड समितीच्या पहिल्या बैठकीतच हे काम किती कठीण आहे हे स्पष्ट झाले होते.१९ जुलै रोजी ही बैठक शोध समिती स्थापन करण्यासाठी झाली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीला त्यांना पूर्ण सदस्य म्हणून न बोलावता ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बोलावल्यामुळे उपस्थित राहण्यास नकार दिला होता. तरीही निवड समितीने बैठक घ्यायचा निर्णय घेतला होता. पंतप्रधानांसह सर्व सदस्यांनी प्रत्येकाने पाच तज्ज्ञांची नावे पुढील बैठकीत सूचवावीत, असे ठरवण्यात आले. एवढेच काय खरगे यांनाही पाच नावे सूचवण्यास विनंती केली जाईल. या २५ तज्ज्ञांच्या यादीतून लोकपाल शोध समितीची स्थापना केली जाईल. या २५ जणांतून या शोध समितीत आठ जणांचा समावेश केला जाईल. विशेष म्हणजे लोकपाल निवड समितीच्या पहिल्या बैठकीला जे चार सदस्य हजर होते त्यांनाही लोकपाल शोध समितीचे सदस्य बनू शकतील अशा सक्षम पाच लोकांची नावे निवडण्यात अडचणी आल्या. दोन सदस्यांना नावे शोधण्यासाठी वेळ हवा असल्याचे जाणवले तेव्हा मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिले. सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ निवडले जावेत व त्यांच्यातून मग आठ नावे निवडावीत अशी सूचना रोहटगी यांनी केल्याचे समजते. मल्लिकार्जुन खरगे भलेही बैठकीला हजर राहणार नाहीत तरी त्यांनी नावे पाठवावीत अशी विशेष विनंती सरकार त्यांना करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला झटकल्यामुळे लोकपाल निवड समितीची पुढील बैठक सरकार कधी घेणार हे स्पष्ट नाही.मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतही उभी राहिली होती आव्हानेही प्रक्रियाही अवघड असल्यामुळे ती कोणत्याही वेळी पूर्ण होईल हे शक्य नाही. त्याचे कारण म्हणजे आठ सदस्यांची शोध समिती नऊ सदस्यांच्या लोकपाल मंडळासाठी वृत्तपत्रांत योग्य ती जाहिरात देऊन संपूर्ण देशातून अर्ज मागवेल. ही अशीच प्रक्रिया मनमोहनसिंग सरकारने २०१३ मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा संमत झाल्यावर केली होती. फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायमुर्ती के. टी. थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने लोकपालसाठी अर्ज मागवले होते. ३०० जणांनी अर्ज केलाही. परंतु थॉमस यांनी अचानक ती जबाबदारी सोडली व त्यामुळे प्रक्रिया थांबली. नरेंद्र मोदी यांचे सरकार त्याच्या राहिलेल्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करू शकले तर तो चमत्कारच समजावा लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार