शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात रॅगिंगप्रकरणी ५४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:29 IST

आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. . गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता.सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.

हैदराबाद, दि. 19- आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

२९ ऑगस्ट रोजी विद्यापाठीतील सिनिअर विद्यार्थ्यांनी १२ ज्युनिअर विद्यार्थ्यांना एका रूममध्ये नेऊन त्यांना शिक्षा दिली होती. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागंल. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात तक्रार विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली होती. या प्रकरणी विद्यापीठाच्या एका समितीकडून चौकशी झाल्यावर 54 विद्यार्थी दोषी आढळले होते. चौकशी समितीने दोषी विद्यार्थांना निलंबित करण्याची सूचना केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितलं. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दोषी विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थांना वर्षभरासाठी वर्गात हजेरी लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. इतर नऊ विद्यार्थांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे. पण, त्यांना वार्षिक परीक्षा देता येणार आहे. तसंच इतर १३ विद्यार्थ्यांवर नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर उरलेल्या २४ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं असल्याचं विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. व्यंकट दास यांनी सांगितलं. 

देशात २००९ मध्ये रॅगिंगविरोधी कायदा लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर रॅगिंगसंबंधी कुठलीही तक्रार आणि मदतीसाठी सरकारने यंत्रणा उभारली होती. तरीही रॅगिंगचे प्रकार थांबले नाहीत.