शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

सासरी छळ, पित्याने मुलीला वाजत-गाजत परत आणले; धोनीचे शहर रांचीतील 'साक्षी' भारावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 07:10 IST

कैलाशनगर परिसरातील रहिवासी प्रेम गुप्ता यांनी आपली मुलगी साक्षी गुप्ता हिचा सासरी होणारा छळ रोखण्यासाठी धूमधडाक्यात वरात काढली.

रांची : लग्नानंतर धूमधडाक्यात मुलीची पाठवणी करणाऱ्या वडिलांना अनेकदा पाहिले असेल; पण विवाहित मुलीला त्याच थाटामाटात कायमचे माहेरी आणताना कधी पाहिले नसेल; मात्र झारखंडच्या रांचीमधून अशीच घटना समोर आली आहे, ज्यामुळे वडिलांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कैलाशनगर परिसरातील रहिवासी प्रेम गुप्ता यांनी आपली मुलगी साक्षी गुप्ता हिचा सासरी होणारा छळ रोखण्यासाठी धूमधडाक्यात वरात काढली. सासरच्या घरातून बाहेर पडताना आणि माहेरच्या घरी आल्यावर फटाक्यांची आतषबाजी तर केलीच शिवाय ढोल-ताशे वाजवत तिला सन्मानाने घरी आणले. वडिलांच्या या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावलेल्या मुलीने वडिलांसाठी पाेस्टदेखील लिहिली आहे.

वरातीचा व्हिडीओ व्हायरलसाक्षीच्या निर्णयाचे तिच्या कुटुंबीयांनी स्वागत केले आणि रविवारी धूमधडाक्यात मुलीला घरी आणले. साक्षीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आपली मुलगी शोषणापासून मुक्त झाल्याच्या आनंदात हे पाऊल उचलले, असे वडील म्हणाले. वरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, ‘बाप असावा तर असा’, ‘समाजासाठी मोठा संदेश दिला आहे’, अशा प्रतिक्रियांसह नेटकरी वडिलांवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. 

म्हणून संपवले नातेगेल्यावर्षी एप्रिल महिन्यात साक्षीचे सचिन कुमारशी लग्न झाले. तो वीज वितरण महामंडळात सहायक अभियंता म्हणून काम करतो. सचिनचे आधीच दोनदा लग्न झाले होते; पण त्याने ही बाब साक्षी आणि तिच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. लग्नानंतर साक्षीला त्रास देण्यास सुरुवात केली. सचिन तिला घराबाहेर काढायचा. तरी साक्षी सर्व सहन करीत होती. सचिनच्या दोन लग्नांबाबतचे सत्य समजल्यावरही साक्षीने लग्न टिकविण्याचा पूर्ण प्रयत्न केला; मात्र, छळ सहन करणे कठीण झाल्यामुळे तिने नाते संपविले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल