शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
3
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
4
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
5
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
8
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
9
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
10
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
11
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
12
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
13
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
14
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
15
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
16
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
17
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
18
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
19
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
20
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय

कच्छच्या निर्मनुष्य वाळवंटात सापडली दफनभूमी, समोर आला हजारो वर्षांपूर्वीचा ठेवा, होणार अनेक रहस्यांचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:52 IST

Harappa Civilization: गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खटिया गावाबाहेर असलेल्या १६ हेक्टर परिसरातील शुष्क जमिनी खालील अनेक रहस्य दबलेली आहेत. येथे बांगड्या, मातीची भांडी, दगडी पाते, एवढंच नाही तर मानवी सांगाडाही सापडला आहे

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खटिया गावाबाहेर असलेल्या १६ हेक्टर परिसरातील शुष्क जमिनी खालील अनेक रहस्य दबलेली आहेत. येथे बांगड्या, मातीची भांडी, दगडी पाते, एवढंच नाही तर मानवी सांगाडाही सापडला आहे. २०१८ नंतर पुरातत्त्ववेत्त्यांच्या एका बहु अनुशासनात्मक आंतरराष्ट्रीय टीमने  ५०० थडग्यांचा शोध लावला आहे. त्यामधील १९७ थडग्यांचं खोदकाम झालं आहे. त्यातून अनेक रहस्यांचा उलगडा झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार केरळ विद्यापीठात पुरातत्त्व विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या राजेश एस.व्ही यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यात आला. त्यामध्ये ही दफनभूमी सापडली. ती ५ हजार वर्षे जुनी असावी, असा शोधकर्त्यांचा अंदाज आहे. हा भाग हडप्पा संस्कृतीच्या पूर्व शहरी चरणाशी संबंधित होता. ही दफनभूमी ही एका मोठ्या मानवी वस्तीसाठी तयार करण्यात आली होती. की ती छोट्या समुहासाठी केलेली एक सामान्य सुविधा होती, याचा शोध घेतला जात आहे.

हडप्पा संस्कृती जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. ती सुमारे ५ हजार इसवी सनापूर्वीपासून ते इसवी सनापूर्वी १००० वर्षांपर्यंत सिंधू नदीच्या किनाऱ्यावर नांदत होती. आतापर्यंत येथील भागातून जे काही अवशेष मिळाले आहेत, ते पाहता ते पूर्व-शहरी हडप्पा काळाशी अनुरूप असे आहेत.  खटिया येथी उत्खनन योजनेचे सहसंचालक आणि केरळ विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक अभयन जीएस यांनी सांगितले की, खटिया येथे सापडलेल्या साहित्यामधील मातीच्या भांड्यांची तुलना ही सिंध, बलुचिस्तान आणि उत्तर गुजरातमधील पूर्व शहरी हडप्पा मातीच्या भांड्यांशी केली जाऊ शकते.

त्यांनी सांगितले की, खटिया येथील माती आम्लयुक्त आहे. त्यामुळे मृतदेहांचं वेगाने विघटन होतं. त्यामुळे संशोधकांना या ठिकाणाहून खोदण्यात आलेल्या नमुन्यांमधून डीएनए शोधण्यात अडचणी येत आहेत. जोपर्यंत डीएनए सापडत नाही, तोपर्यंत खटिया येथील रहस्यं उलगडता येणार नाहीत. आता इथे दफन करण्यात आलेले लोक हे कुठून आले होते हा प्रश्न पडला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :historyइतिहासGujaratगुजरात