शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:17 IST

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील जिलानी हे तिसऱ्या पिढीतील कारागीर आहेत जे धार्मिक ‘महाविरी’ ध्वज बनवण्यात  निष्णात आहेत.

हजारीबाग : झारखंडमधील कारागीर गुलाम जिलानी (५५) यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी ४० फूट लांब आणि ४२ फूट रुंद ‘हनुमान ध्वज’ तयार केला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर हा ध्वज फडकावला जाईल.झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील जिलानी हे तिसऱ्या पिढीतील कारागीर आहेत जे धार्मिक ‘महाविरी’ ध्वज बनवण्यात  निष्णात आहेत. जिलानी  म्हणाले की, १०० कोटी लोकांचे स्वप्न असलेल्या ऐतिहासिक राम मंदिरावर मी शिवलेला ध्वज बसविला जाईल, याचा अभिमान आहे. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढेल. मला संधी मिळाली तर उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी नक्कीच अयोध्येला जाईन. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा किंवा रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जिलानी म्हणाले की मी माझ्या वडिलांसोबत फतेह लाल अग्रवाल यांच्या मालकीच्या भोला टेक्सटाईलमध्ये काम करायचो. सध्या ते वीर वस्त्रालयात काम करतात.

१० दिवस ध्वज तयार करण्यासाठी लागले. सध्या ध्वज तयार आहे.१५० मीटर कपड्याचा वापर ध्वज तयार करण्यासाठी करण्यात आला.१०० फूट उंचीच्या खांबावर या ध्वजाची स्थापना करण्यात येणार आहे.२१ हजार रुपये या ध्वजाची किमत.

ऐक्य मजबूत करण्याचे काम- वीर वस्त्रालयाचे मालक देवेंद्र जैन म्हणाले, “४० फूट उंच ध्वजाच्या एका बाजूला भगवान हनुमानाची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवान राम आणि लक्ष्मण यांची प्रतिमा आहे. - जिलानी यांनी हजारो रामनवमी आणि महाविरी ध्वज बनविले आहेत जे या प्रदेशात हिंदू-मुस्लिम ऐक्य मजबूत करतात. हा ध्वज बनवण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) बडा बाजार हजारीबाग येथील प्रमुख नेते नवल किशोर खंडेलवाल यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. - खंडेलवाल (८१) हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.

विदेशातूनही झेंडे बनविण्याचे कामवीर वस्त्रालयाद्वारे दरवर्षी सर्व धर्मांसाठी दोन लाखांहून अधिक ध्वज बनवले जातात. रामनवमी आणि शिवरात्रीला परदेशातून झेंडे बनवण्याचे कामही मिळत असल्याचे जैन यांनी सांगितले. खंडेलवाल यांनी म्हटले की, बाबरी मशीद विध्वंसानंतर अटक करून तीन महिने कारागृहात ठेवण्यात आले होते. अयोध्येत राम मंदिर पाहण्याचे माझे स्वप्न ३२ वर्षांनी पूर्ण होत आहे. सध्या तब्येत ठीक नाही, पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात येण्यासाठी प्रयत्न करेन. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या